शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

ंमंगळवारी दोन्ही संघ होणार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 7:01 PM

नाशिक : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्यावतीने गोल्फ क्कलब मैदान येथे घेण्यात येणाऱ्या रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी मंगळवारी महाराष्ट्र  आणि सौराष्ट्र ...

ठळक मुद्देरणजी क्रिकेट : बुधवारी दोन्ही संघ करणार सराव

नाशिक: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्यावतीने गोल्फ क्कलब मैदान येथे घेण्यात येणाऱ्या रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी मंगळवारी महाराष्ट्र  आणि सौराष्ट्र या दोन्ही संघांचे आगमन होणार आहे. येत्या १४ पासून या दोन्ही संघामध्ये रणजी सामना होणार असल्याने सामन्यापूर्वी किमान दोन दिवस दोन्ही संघ या मैदानावर सराव करणार आहेत.रणजी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र विरूद्ध सौराष्ट्र यांच्यात १४ ते १७ दरम्यान गोल्फ क्कलब मैदान येथे सामना होणारआहे. या सामान्यासाठी मैदानाची जोरदार तयारी सुरू असून भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या देखरेखीखाली खेळपट्टीसह अन्य तयारीला वेग आला आहे. नाशिकच्या मैदानावर होणारा हा नववा रणजी सामना आहे. परंतु यंदा बीसीसआयच्या नियमांमुळे सामना आयोजन ते सामना संपेपर्यंत अनेक काटेकोर नियमांची अंमलबजावणी करावी लागणार आहे.यंदाच्या मोसमात झालेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्रने चार गुण कमाविले आहेत व ते ग्रुप ‘ए’ मध्ये सातव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे सौराष्ट्रने एका विजायाची नोंद करीत १३ गुण मिळविले आहे. या गटात सौराष्ट्र तिसºया क्रमांकावर आहे. त्यामुळे उभय संघामधील कोणत्या खेळाडूची कामगिरी नाशिकच्या मैदानावर उंचावते याकडे साºयांचेच लक्ष असणार आहे. नाशिकच्या या मैदानावर अनेक फलंदाज आणि गोलंदाजांनीही लक्ष वेधून घेतले आहे. या मैदानावरील कामगिरीनंतर अनेक दिग्गज खेळाडूंना भारतीय क्रिकेटचे दरवाजे खुले झाल्याचा इतिहास आहे.दरम्यान, मंगळवारी रात्री किंवा बुधवारी पहाटे दोन्ही संघांचे नाशिकमध्ये आगमन होणार आहे. यापूर्वी झालेल्या कामगिरीच्या आधारावर उभय संघांची निवड होणार आहे. महाराष्ट्र कडून केदार जाधव तर सौराष्ट्र कडून डावरा जलदगदी गोलंदाज जयदेव उनाडकट यांची नावे चर्चेत आहेत. परंतु जाधव नाशिकमध्ये खेळू शकेल की नाही याविषटी ठामपणे सांगितले जात नाही.या सामन्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मैदान तयारीच्या बारकाईकडे समस्त कार्यकारिणी बारकाईने लक्ष ठेऊन आहे. मैदानाबरोबरच स्टेडीयम उभारण्याच्या कामाल गती देण्यात आली असून या कामावर कार्यकारिणीकडून तसेच बीसीसीआयकडून लक्ष केंद्रीत करण्यात आले आह े.

टॅग्स :NashikनाशिकCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी