नशिक परिमंडळाचे ‘शापित माणसांचे गुपित’ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 20:08 IST2019-11-07T20:06:45+5:302019-11-07T20:08:41+5:30

नाशिक : कोकण परिक्षेत्रांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महावितरणच्या नाट्य स्पर्धेत नाशिक परिमंडळाचे ‘शापित माणसांचे गुपित’ हे नाटक प्रथम ठरले. ...

nashik,the,secret,of,the,cursed,man,nashik,area,first | नशिक परिमंडळाचे ‘शापित माणसांचे गुपित’ प्रथम

नशिक परिमंडळाचे ‘शापित माणसांचे गुपित’ प्रथम

ठळक मुद्देनाट्य स्पर्धा : अन्य विभागातील पाच बक्षीसेही पटकाविली

नाशिक: कोकण परिक्षेत्रांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महावितरणच्या नाट्य स्पर्धेत नाशिक परिमंडळाचे ‘शापित माणसांचे गुपित’ हे नाटक प्रथम ठरले. विविध गटातील पाच अन्य पुरस्कारही परिमंडळाने पटकाविले. भांडूप परिमंडळ द्वितीय ठरले. कोकण परिक्षेत्राचे सहव्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
कोकण परिक्षेत्राअंतर्गत माउली सांस्कृतीक सभागृह गेल्या पाच नोहेंबर पासून सुरु असलेल्या नाट्य स्पर्धेचा गुरु वारी समारोप झाला. या स्पर्धेत महावितरणच्या नाशिक परीमंडळाकडून अहमदनगर येथील स्थानिक कर्मचारी असलेल्या नाटयकलावंतानी सादर केलेल्या ‘शापित माणसांचे गुपित ’ या नाटकाने बाजी मारली. भांडूप परिमंडळाच्या ‘ आय अ‍ॅग्री’ या नाटकाने द्वितीय क्र मांक मिळविला.
यावेळी काळम म्हणाले की, या नाट्य स्पर्धांच्या माध्यमांतून आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात, त्यामधून आपण चांगल्या बाबी अवगत करून जीवनाच्या नाट्य क्षेत्रामध्ये आपल्याला मिळालेल्या विविध भूमिका चोखपणे व योग्यपणे बजविल्या पाहिजे असे सांगितले. याप्रसंगी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनीही मार्गदर्शन केले. ााशिक परीमंडळाचे मुख्य अभियंता ब्रीजपालिसंह जनविर यांनीही मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अंकुश नाळे, उप महाव्यवस्थापक अनिल बराटे, सुनील पाठक, योगेश खैरनार, राम गोपाल अिहर, अधिक्षक अभियंता प्रवीण दरोली, नाट्य परीक्षक पुरु षोत्तम देशपांडे, रितेश साळुंके डॉ. धनश्री खरवंडीकर, संजय कळमकर आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन ईश्वर पाटील आणि राजेंद्र धाडगे यांनी तर आभार प्रदर्शन अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी केले. या स्पर्धेकरीता सांघिक कार्यालय मुंबई,नाशिक, जळगाव,कल्याण आण िभांडूप परिमंडळातील सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: nashik,the,secret,of,the,cursed,man,nashik,area,first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.