शिवशाहीची रिक्षाला धडक : तीन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:24 IST2018-05-21T22:24:54+5:302018-05-21T22:24:54+5:30

नाशिक : नाशिक - नंदुरबार या शिवशाही बसने रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षाचालकासह दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि़२१) सांयकाळच्या सुमारास गडकरी सिग्नल-सारडा सर्कल या रस्त्यावरील बग्गा स्विटस्‌ समोरच्या चौफुलीवर घडली़ या अपघातात रिक्षाचा चेंदामेंदा झाला असून, यातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत़

nashik,Shivshahi,bus,rickshaw hit,Three,seriously,injured | शिवशाहीची रिक्षाला धडक : तीन गंभीर जखमी

शिवशाहीची रिक्षाला धडक : तीन गंभीर जखमी

ठळक मुद्देसायंकाळची घटना : जखमींवर उपचार

नाशिक : नाशिक - नंदुरबार या शिवशाही बसने रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षाचालकासह दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि़२१) सांयकाळच्या सुमारास गडकरी सिग्नल-सारडा सर्कल या रस्त्यावरील बग्गा स्विटस्‌ समोरच्या चौफुलीवर घडली़ या अपघातात रिक्षाचा चेंदामेंदा झाला असून, यातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गडकरी सिग्नलजवळील एऩडी़पटेल रस्त्यावर बग्गा स्विटस्‌ समोरच्या चौफुलीवर नाशिक - नंदुरबार ही शिवशाही बस (एमएच 06 बीडब्ल्यु 0998) भरधाव आली. बसचालकाचे नियंत्रण सुटले व त्याने रिक्षाला (एमएच 15 झेड 2669) जबर धडक दिली़ यावेळी झालेल्या आवाजानंतर नागरीकांच्या मदतीसाठी अपघातस्थळी धाव घेतली़ या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला असून, रिक्षाचालक नितीन मधुकर जाधव (55, रा. पंचशील नगर, गंजमाल) व दोन प्रवासी गंभीर जखमी झाले़

नागरिकांनी अपघतात जखमी झालेल्या प्रवाशांना खासगी रुग्णालयात तर रिक्षाचालकास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या अपघाताची मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

Web Title: nashik,Shivshahi,bus,rickshaw hit,Three,seriously,injured