सात महिन्यांपासून फरार साबळे खूनातील संशयित पवारला चेंबूरहून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 15:40 IST2018-01-10T15:39:44+5:302018-01-10T15:40:38+5:30
नाशिक : पेठरोडवरील सराईत गुन्हेगार किरण निकमच्या खुनातील संशयित बंडू मुर्तडक ऐवजी त्याच्या चेहºयाशी साधर्म्य असलेल्या कसाºयातील निष्पाप तुषार साबळे या तरुणाचा खूनातील संशयित शुभम पवार यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व त्यांच्या पथकाने बुधवारी (दि़१०) मुंबईतील चेंबूर परिसरातून अटक केली आहे़ नाशिकरोड परिसरातील मंगलमूर्तीनगरमध्ये २५ मे रोजी निष्पाप तुषार साबळे या युवकाचा निर्घुन खून केल्याची घटना घडली होती़

सात महिन्यांपासून फरार साबळे खूनातील संशयित पवारला चेंबूरहून अटक
नाशिक : पेठरोडवरील सराईत गुन्हेगार किरण निकमच्या खुनातील संशयित बंडू मुर्तडक ऐवजी त्याच्या चेहºयाशी साधर्म्य असलेल्या कसाºयातील निष्पाप तुषार साबळे या तरुणाचा खूनातील संशयित शुभम पवार यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व त्यांच्या पथकाने बुधवारी (दि़१०) मुंबईतील चेंबूर परिसरातून अटक केली आहे़ नाशिकरोड परिसरातील मंगलमूर्तीनगरमध्ये २५ मे रोजी निष्पाप तुषार साबळे या युवकाचा निर्घुन खून केल्याची घटना घडली होती़
पंचवटी - पेठरोड परिसरातील सराईत गुन्हेगार किरण राहूल निकम याचा भाजीपाला व्यवसायाच्या वादातून गतवर्षी १९ मे रोजी संशयित संतोष उघडे, संतोष पगारे, गणेश उघडे, बंडू मुर्तडक व त्यांच्या साथीदारांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घुन खून केल्याची घटना घडली होती़ या खूनाचा सुड घेण्यासाठी मयत किरणचा भाऊ शेखर निकम याने बंडू मुर्तडकचा खूनाचा कट रचला होता़ त्यानुसार २५ मे २०१७ रोजी बंडू मुर्तडक हा उपनगर परिसरातील मंगलमुर्तीनगरमधील हर्ष अपार्टमेंटमध्ये आल्याची माहिती मिळाल्याने शेखर निकम व त्याचे सात-आठ साथीदार दुपारी चार वाजेच्या सुमारास ओम्नी, अल्टो व इंडिगो कारमधून पोहोचले़ त्यांनी बंडू मुर्तडक समजून त्याच्या चेहºयाशी साधर्म्य असलेला कसारा येथील तुषार भास्कर साबळे या पाहूणा म्हणून आलेल्या युवकावर गोळीबार तसेच धारदार शस्त्राने वार करून खून केला व फरार झाले़
पोलिसांनी शेखर निकम व त्याच्या साथीदारांना औरंगाबादमधून अटक केली़ मात्र, साबळेच्या खूनातील संशयित शिवम ऊर्फ शुभम सुरेश पवार (रा़महालक्ष्मी चाळ, वाल्मिक मंदिराच्या मागे, द्वारका, नाशिक) हा तेव्हापासून फरार झाला होता़ गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस शिपाई स्वप्निल जुंद्रे यांना फरार पवार हा म्हाडा वसाहत, माहुल गाव, चेंबूर, मुंबई येथे असलयाची माहिती मिळाली होती़ या माहितीवरून वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, पोलीस हवालदार रविंद्र बागूल, पोलीस शिपाई विशाल देवरे, स्वप्निल जुंद्रे, राहुल पालखेडे, दीपक जठार यांनी शिताफीने चेंबूरहून अटक केली़ गुन्हे शाखेने संशयित पवार यास उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे़