शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉकेथॉन’मध्ये नाशिककरांचा उत्स्फुर्त सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 16:51 IST

रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त जिल्हा प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने अवयवदान जनजागृतीसाठी ईदगाह मैदान येथे ‘वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देरस्ता सुरक्षा अभियानानिमित्त अवयवदान जनजागृतीसाठीवाहतूक सुरक्षेसह अवयवदानाचा जागर केलाअवयवदान आणि वाहतूक सुरक्षेची शपथ दिली

नाशिक : राज्यात सध्या सर्वत्र रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते आहे. अपघातवाढ तसेच अपघाती मृत्यू रोखण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे. यासाठीच रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त जिल्हा प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने अवयवदान जनजागृतीसाठी शुक्रवारी (दि.१७) सकाळी ८ वाजता ईदगाह मैदान येथे ‘वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते.     रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त यंदा पहिल्यादांच प्रादेशिक परिवहन विभागाने अवयवदान जनजागृतीसाठी या ‘वॉकेथॉन’चे आयोजन के ले होते. अवयवदान आज सर्वात श्रेष्ठ दान समजले जात असून यामुळे एखाद्या व्यक्तिचे प्राण वाचविण्यास मोठी मदत होते. त्यामुळे या वॉकथॉनमध्ये वाहतूक सुरक्षेकडे गांभीर्याने पाहत असतानाच, अवयवदानाची चळवळ अधिक बळकट होण्याची गरज असल्याचे आवाहन करत, ‘अवयव जपा, वापरा आणि दान करा’, ‘वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा’, असे फलक यावेळी लावण्यात आले होते. यावेळी शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसह स्वयंसेवी संस्थाचे सदस्य व नाशिककरांनी वाहतूक सुरक्षेसह अवयवदानाचा जागर केला. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय आहिरे यांसह इतर मान्यवर मंचावर होते. प्रारंभी अवयवदानासह वाहतूक सुरक्षेबाबत मान्यवरांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी वॉके थॉनमध्ये मायको सर्कल ते ईदगाह मैदानापर्यंत ठिकठिकाणी अवयवदानाबाबत जनजागृती क रण्यात आली. कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ईदगाह मैदानापासून सकाळी ८ वाजता वॉकेथॉनला प्रारंभ झाला. मायको सर्कलपासून पुन्हा ईदगाह मैदानावर येत असताना ‘हेल्मेट घाला, सिग्नल तोडू नका’, ‘वेगाची नशा, जीवनाची दुर्दशा’, ‘चला अवयवदानाचा संकल्प करूया’, असे फलक उंचावून घोषणाबाजी करत जनजागृती करण्यात आली. यावेळी कसळकर यांनी उपस्थित नाशिककरांना अवयवदान आणि वाहतूक सुरक्षेची शपथ दिली. तसेच यावेळी अवदान करु इच्छिणाऱ्या व ते घेऊ इच्छिणाºया गरजू व्यक्तिंनी नोंदणी कोठे करावी याची प्राथमिक माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयHealthआरोग्य