स्मार्ट सिटीत नाशिकचा क्रमांक घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 00:19 IST2020-10-17T22:55:16+5:302020-10-18T00:19:43+5:30
नाशिक : सुमारे अडीच महिनाभरापूर्वी देशात सोळावा आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळवणा?्या नाशिकचा क्रमांक काहीसा घसरला आहे. आता नाशिकच्या कंपनीचा देशात अठरावा आणि राज्यात दुसरा आला आहे. पुणे महापालिकेने आता देशात तेरावा, तर राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.

स्मार्ट सिटीत नाशिकचा क्रमांक घसरला
नाशिक : सुमारे अडीच महिनाभरापूर्वी देशात सोळावा आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळवणा?्या नाशिकचा क्रमांक काहीसा घसरला आहे. आता नाशिकच्या कंपनीचा देशात अठरावा आणि राज्यात दुसरा आला आहे. पुणे महापालिकेने आता देशात तेरावा, तर राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.
नाशिकच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांबाबत सध्या वाद निर्माण झाला असतानाच आता नेमकी कंपनीच्या कामगिरीवरून क्रमांक घसरल्याने अडचण वाढण्याची शक्यता आहे. मात्र, अशा स्वरूपाचे मूल्यमापन दर आठवड्याला होत असते आणि गुणांची क्रमवारी जाहीर होत असते. त्यामुळे त्यातून फार फरक पडत नसल्याचे नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कायर्कारी अधिकारी प्रकाश थविल यांनी सांगितले नाशिक शहराचा स्मार्ट सिटी योजनेच्या दुस?्या फेरीत निवड झाली. त्यानंतर कंपनीने ५२ प्रकल्प आखले आहेत. त्यातील बहुतांश कामे पुर्ण झाल्याचा कंपनीचा दावा आहे. आॅगस्टमध्ये कंपनीची कामगिरी सुधारली असली तरी त्यापूर्वी देशातील शंभर शहरात नाशिकचा ३९वा क्रमांक आला होता. मात्र, त्यानंतर लॉकडाऊन काळातदेखील नाशिकच्या स्मार्ट सिटी कंपनीची कामगिरी सुधारली आणि गेल्या आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचा क्रमांक देशात सोळावा आणि राज्यात पहिला आला होता. त्यावेळी पुणे शहराचा क्रमांक २८वा, तर नागपूर ४२, सोलापूर शहराचा ४३, ठाण्याचा ५५ आणि पिंप्री-चिंचवड शहराचा ६१, कल्याण डोंबिवली ६२, तर औरंगाबाद शहराचा ६६वा क्रमांक आला होता. नाशिकच्या स्मार्ट सिटी कंपनीची कामगिरी मात्र या शहरांपेक्षा सरस ठरली होती.
स्मार्ट सिटीच्या क्रमावारीत नाशिकची घसरण झाली असली तरी पुण्याच्या तुलनेत अत्यल्प गुण कमी झाले आहेत. निविदा मागविणे, त्या मंजुर करणे अशा स्वरूपाच्या दर आठवड्याच्या कामगिरीतून बदल होऊ शकतो.
- प्रकाश थविल, सीईओ, स्मार्ट सिटी कंपनी, नाशिक
महाराष्ट्रातील शहरांची देशातील क्रमवारी
पुणे - १३, नाशिक- १८, ठाणे- २२, नागपूर- ३१, पिंप्री-चिंचवड- ४१, सोलापूर - ५०, कल्याण डोंबिवली- ६५, औरंगाबाद- ६८