शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

नाशिकची मदार वाढीव व्हेंटिलेटरवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 11:27 PM

शहराची लोकसंख्या २० लाख, जिल्ह्याची लोकसंख्या ६२ लाख, आतापर्यंतच्या बाधितांचा एकूण आकडा चार हजारांच्या घरात, त्यात सध्या उपचार घेत असलेले एकूण रुग्ण १५००हून अधिक, तर नाशिक जिल्ह्यामधील एकूण व्हेंटिलेटर्सची संख्या अवघी २३५ आहे. कोरोनाच्या दहशतीला तीन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही प्रशासनाला व्हेंटिलेटर्सच्या संख्येमध्ये फारशी वाढ करता आलेली नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्याची मदार अजून मागविलेल्या ३० व्हेंटिलेटरवरच आहे.

ठळक मुद्देयंत्रणा अपुरी : जिल्हा रुग्णालय, मनपाचे ८५, तर खासगी १५० व्हेंटिलेटर्सच उपलब्ध

नाशिक : शहराची लोकसंख्या २० लाख, जिल्ह्याची लोकसंख्या ६२ लाख, आतापर्यंतच्या बाधितांचा एकूण आकडा चार हजारांच्या घरात, त्यात सध्या उपचार घेत असलेले एकूण रुग्ण १५००हून अधिक, तर नाशिक जिल्ह्यामधील एकूण व्हेंटिलेटर्सची संख्या अवघी २३५ आहे. कोरोनाच्या दहशतीला तीन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही प्रशासनाला व्हेंटिलेटर्सच्या संख्येमध्ये फारशी वाढ करता आलेली नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्याची मदार अजून मागविलेल्या ३० व्हेंटिलेटरवरच आहे.नाशिकमधील बाधितांच्या आकड्याच्या दृष्टीने जुलै आणि आॅगस्ट हे दोन महिने कोरोनाच्या दृष्टीने जिल्ह्यासाठी सर्वाधिक घातक ठरण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. नजीकच्या भविष्यात ही व्हेंटिलेटर्स अपुरी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरातील वाढती रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्या हा जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाचा विषय ठरत आहे. नाशिकमध्ये आरोग्य यंत्रणाच संभ्रमित झाले असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाग्रस्त नाशिकच्या पार्श्वभूमीवर ३१ हजार ७९४ नाशिककरांमागे केवळ एकच व्हेंटिलेटर सध्या नाशकात उपलब्ध आहे. परंतु, सध्या व्हेंटिलेटरची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांना पुरेसे व्हेंटिलेटर असल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, रुग्णांची संख्या वाढत असून, अधिकच उद्रेक वाढल्यास आपण या महामारीचा सामना करण्यास कितपत सज्ज आहोत, हे सांगण्यास यंत्रणादेखील हतबल आहे. शहरातील आरोग्य यंत्रणांना तोकड्या साधनांमध्ये कोरोनाचा सामना करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने मागविलेले ३० व्हेंटिलेटर त्यांना उपलब्ध झालेले नाहीत.महापालिकेला मिळाले केवळ ३६ व्हेंटिलेटरजिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर वाढविण्याचे प्रयत्न झाल्यानंतर ही संख्या जिल्ह्यात ८५ वर पोहोचली आहे. नाशिक महापालिकेला शुक्रवारी ३६ व्हेंटिलेटर उपलब्ध झाली आहेत. जिल्हा रुग्णालयासह मनपांची सर्व रुग्णालये मिळून एवढेच व्हेंटिलेटर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये असलेले सुमारे १५० व्हेंटिलेटर हेच शासकीय यंत्रणेसाठी काहीसा आधार ठरू शकणार आहेत.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य