नाशिकरोडला तरुणीचा पाठलाग करून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 22:34 IST2018-05-06T22:34:55+5:302018-05-06T22:34:55+5:30

नाशिक : स्वयंपाकाचे काम आटोपून सायकलने घरी परतत असलेल्या बावीस वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिला अडवत विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास नाशिकरोडच्या गंधर्वनगरी परिसरात घडली़ सचिन सखाराम गायकवाड ( ३०, रा. लोकमान्यनगर, गंधर्वनगरी) असे विनयभंग करणाऱ्या संशयिताचे नाव आहे़

nashikroad,women,Molestation,crime,registered | नाशिकरोडला तरुणीचा पाठलाग करून विनयभंग

नाशिकरोडला तरुणीचा पाठलाग करून विनयभंग

ठळक मुद्देउपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : स्वयंपाकाचे काम आटोपून सायकलने घरी परतत असलेल्या बावीस वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिला अडवत विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास नाशिकरोडच्या गंधर्वनगरी परिसरात घडली़ सचिन सखाराम गायकवाड ( ३०, रा. लोकमान्यनगर, गंधर्वनगरी) असे विनयभंग करणाऱ्या संशयिताचे नाव आहे़

उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंधर्वनगरी परिसरात राहणारी युवती आपल्या उदरनिर्वाहासाठी स्वयंपाकाचे काम करते़ गुरुवारी रात्री स्वयंपाकाचे काम आटोपल्यानंतर सायकलने ती रात्री घरी परतत होती़ या युवतीचा संशयित गायकवाड याने पाठलाग करून अडवून प्रेमाची मागणी करीत तिच्या सायकलला लाथ मारून विनयभंग केला़ तसेच आपल्याबरोबर संबंध न ठेवल्यास सुखाने राहू देणार नसल्याची धमकीही दिल्याचे या तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़

या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गायकवाड विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: nashikroad,women,Molestation,crime,registered