अनैतिक व्यवसायावर नाशिकरोड पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 17:31 IST2018-06-06T17:31:26+5:302018-06-06T17:31:26+5:30

Nashik,Road,police,unethical,business,raids | अनैतिक व्यवसायावर नाशिकरोड पोलिसांचा छापा

अनैतिक व्यवसायावर नाशिकरोड पोलिसांचा छापा

ठळक मुद्देपुणे महामार्गावरील चिंचोली फाटा

नाशिक - पुणे महामार्गावरील चिंचोली फाट्याजवळील ढाब्यावर सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर मंगळवारी (दि़५) रात्री नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकला़ पोलिसांनी दोन पिडीत महिलांची सुटका करून ढाब्याचा मालक, व्यवस्थापक व अन्य दोन अशा चौघा संशयितांना अटक केली आहे़

पुणे महामार्गावरील चिंचोली फाटा येथील ओम साई मामा फौजी ढाबा या ठिकाणी दोन महिलांककडून अनैतिक व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांना मिळाली होती़ कोकाटे यांनी दिलेल्या आदेशानुसार या माहितीनुसार नाशिकरोड पोलिसांनी या ढाब्यावर बनावट गिºहाईक पाठवून खात्री केली़ पोलिसांची खात्री झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास छापा टाकून दोन पिडीत महिलांची सुटका केली़ त्यातील एक पश्चिम बंगालच्या परगणा जिल्ह्यातील गामघाटा येथील तर दुसरी अहमदनगर जिल्ह्यातील दौंड रोड परिसरातील आहे़ पोलिसांच्या या कारवाईदरम्यान हॉटेलमधील काही संशयिता अंधाराचा फायदा घेत पसारही झाले़

नाशिकरोड पोलिसांनी ओम साई मामा फौजी ढाब्याचे मालक सुनीचरण जगबंधू जेना (रा. पार्थअंजन रो-हाऊस, जय भवानी रोड, नाशिकरोड), व्यवस्थापक प्रफुल्ल लक्ष्मीधर प्रधान (३१, रा. रो-हाऊस नंबर ६, लवटे मळा, जय भवानी रोड, नाशिकरोड), संजू सुनीचरण जेना (१९, रा. पार्थअंजन रो-हाऊस, लवटेनगर, जय भवानी रोड, नाशिकरोड), पुरुषोत्तम दशरथ नायर (४७, रा. किस्मत, कृष्णपूर, वासुदेवपूर, भद्रक, ओरिसा) या चौघांना अटक करून त्यांच्यावर पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़ 

Web Title: Nashik,Road,police,unethical,business,raids