कॉलेजरोड परिसरात रिक्षाचालकांची मुजोरी; व्यावसायिकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 23:05 IST2018-07-30T23:05:10+5:302018-07-30T23:05:47+5:30
नाशिक : कारला कट का मारला याचा जाब विचारल्याचा राग आलेल्या रिक्षाचालकांच्या टोळीने व्यावसायिकास बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी (दि़२९) सायंकाळी कॉलेजरोड परिसरात घडली़ याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी रिक्षाचालक प्रल्हाद बनसोडे (रा. संत कबीरनगर) विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या घटनेमुळे शहरातील रिक्षाचालकांची गुंडगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे़

कॉलेजरोड परिसरात रिक्षाचालकांची मुजोरी; व्यावसायिकास मारहाण
नाशिक : कारला कट का मारला याचा जाब विचारल्याचा राग आलेल्या रिक्षाचालकांच्या टोळीने व्यावसायिकास बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी (दि़२९) सायंकाळी कॉलेजरोड परिसरात घडली़ याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी रिक्षाचालक प्रल्हाद बनसोडे (रा. संत कबीरनगर) विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या घटनेमुळे शहरातील रिक्षाचालकांची गुंडगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंदवलीतील रिअल इस्टेट व्यावसायिक सचिन अशोक गणोरे हे रविवारी (दि.२९) रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या बीएमडब्ल्यू कारमधून (एमएच ४० केआर ६६६६) कुटुंबीयांसोबत जात होते. कॉलेजरोडवरील भोसला टी पॉइंटजवळ संशयित प्रल्हाद बनसोडे याने उलट्या दिशेने येत कारला (एमएच १५ झेड ४१८६) रिक्षाने कट मारला़ याबाबत गणोरे यांनी रिक्षचालकास जाब विचारला असता त्याने इतर रिक्षाचालकांच्या मदतीने गणोरे यांच्यावर हल्ला करून कुटुंबीयांनाही शिवीगाळ केली़
शहरात काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांकडून प्रवाशांसोबत अरेरावी, महिलांची छेडछाड, विद्यार्थिनींचा पाठलाग या तक्रारी वाढल्या आहेत़ पोलिसांकडून अशा मुजोर रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे़