शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

पंचवटी एक्स्प्रेसमध्ये उंदरांचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 9:21 PM

मंत्रालयातील उंदीर प्रकरण गाजत असतानाच पंचवटी एक्स्प्रेसमध्येदेखील उंदरांच्या उपद्रवाचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सकाळी पंचवटी एक्स्प्रेसमध्ये झोपलेल्या एका प्रवाशाला उंदीर चावल्यामुळे रेल्वे डब्यात उंदरांची संख्या वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देप्रवाशाला चावा : प्लॅटफॉर्मवरही उंदरांचा उपद्रवउंदरांच्या भीतीने झोप घेणारे प्रवासीही धास्तावले

नाशिक : मंत्रालयातील उंदीर प्रकरण गाजत असतानाच पंचवटी एक्स्प्रेसमध्येदेखील उंदरांच्या उपद्रवाचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सकाळी पंचवटी एक्स्प्रेसमध्ये झोपलेल्या एका प्रवाशाला उंदीर चावल्यामुळे रेल्वे डब्यात उंदरांची संख्या वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्लॅटफॉर्मवर उंदीर असल्याचा प्रवाशांचा अनुभव असला तरी आता डब्यात उंदीर शिरल्याने प्रवाशांची झोप नक्कीच उडाली आहे.मनमाड स्थानकातून निघालेल्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांचा समावेश असतो. रोज सकाळी मुंबई गाठणे आणि रात्री पुन्हा पंचवटीनेच घरी परतणे अशी कसरत चाकरमान्यांना करावी लागते. त्यामुळे सकाळी प्रवास करताना बहुतेक प्रवासी हे नाशिकरोड ते इगतपुरी, कल्याणपर्यंत थोडीशी झोप घेण्याचा प्रयत्न करतात. शुक्रवारी पंचवटी एक्स्प्रेसने नाशिकरोड स्थानक सोडल्यानंतर मनमाडचे दैनंदिन प्रवासी रशीद शेख हे झोपलेले असताना त्यांच्या पायाला उंदराने चावा घेतला. ही बाब एका महिलेने इतर प्रवाशांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर उंदीर हाकलण्यासाठी प्रवाशांना धावपळ करावी लागली. सैरावैरा धावणाºया उंदरामुळे काहीकाळ हास्यकल्लोळही उडाला, मात्र शेख यांच्या पायातून रक्त निघेपर्यंत उंदराने पाय कुरतडल्याचे दिसून आले. त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले.नाशिकहून मुंबईकडे जाणाºया पंचवटी तसेच गोदावरी एक्स्प्रेसमध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात उंदीर आढळत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. कित्येकदा उंदीर प्रवाशांच्या बॅगांमध्येदेखील शिरले आहेत. त्यामुळे उंदरांना हाकलण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. उंदरांच्या भीतीने आता रेल्वेचा प्रवासदेखील आरामदायी राहिला नसल्याचे बोलले जात असून, उंदरांच्या भीतीने झोप घेणारे प्रवासीही धास्तावले आहेत.रेल्वेस्थानक आणि रेल्वे डब्यातील स्वच्छतेबाबत अनेकदा केंद्रीय पातळीवर कंत्राट दिले जाते. परंतु सदर कंत्राट केवळ केरकचरा आणि प्लॅटफॉर्म धुण्यापुरतेच मर्यादित असते. स्थानकावरील उंदीर मारण्यासाठी कोणतेही कंत्राट काढले जात नसल्यामुळे रेल्वेस्थानकावर उंदरांची संख्या वाढल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिकरोड स्थानकावरील प्रवाशांनी येथील स्टेशन मास्तरकडे उंदरांच्या उपद्रवाबद्दल तक्रार केली होती. परंतु उंदीर घालविण्यासाठीची उपायोजनाच नसल्याने या तक्रारींचा काहीही उपयोग झाला नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

टॅग्स :NashikनाशिकRailway Passengerरेल्वे प्रवासी