पाथर्डी फाट्यावर ट्रक दुचाकी अपघातात युवतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 21:47 IST2018-03-13T21:47:19+5:302018-03-13T21:47:19+5:30

सिडको : मुंबई - आग्रा महामार्गावरील पाथर्डी फाट्यावर ट्रक व दुचाकी अपघातात बावीस वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि़१३) रात्रीच्या सुमारास घडली़ हर्षदा प्रभाकर लांडगे (२२, रा़ सिन्नर फाटा, नाशिकरोड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार युवतीचे नाव आह़े

nashik,patharde,phata,truck,two,wheeler,accident,girl,death | पाथर्डी फाट्यावर ट्रक दुचाकी अपघातात युवतीचा मृत्यू

पाथर्डी फाट्यावर ट्रक दुचाकी अपघातात युवतीचा मृत्यू

ठळक मुद्दे पाथर्डी फाटा : ट्रकचालकास अटक

सिडको : मुंबई - आग्रा महामार्गावरील पाथर्डी फाट्यावर ट्रक व दुचाकी अपघातात बावीस वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि़१३) रात्रीच्या सुमारास घडली़ हर्षदा प्रभाकर लांडगे (२२, रा़ सिन्नर फाटा, नाशिकरोड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार युवतीचे नाव आह़े दरम्यान, अंबड पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली आहे़

अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री आठ वाजेच्या सुमारास हर्षदा लांडगे ही युवती अ‍ॅक्टिवा दुचाकीवरून जात होती़ पाथर्डी फाटा येथे ट्रकने (एम एच १८ , एम १८९५) व अ‍ॅक्टिवा दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी ट्रकचालक रामभाऊ शिंदे (रा़नांदूर नाका) विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे़

Web Title: nashik,patharde,phata,truck,two,wheeler,accident,girl,death