तेलाचा डबा असल्याचे सांगून नाशिकमध्ये पाण्याची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 15:37 IST2018-03-02T15:37:49+5:302018-03-02T15:37:49+5:30

नाशिक : तेलाच्या डब्ब्यात पाणी भरून त्यात तेल आहे असे सांगून एकास सात डबे विक्री करून फसवणूक केल्याची प्रकार उघडकीस आला आहे़

nashik,oil,name,Sale,water,crime, registered | तेलाचा डबा असल्याचे सांगून नाशिकमध्ये पाण्याची विक्री

तेलाचा डबा असल्याचे सांगून नाशिकमध्ये पाण्याची विक्री

ठळक मुद्देतेलाऐवजी निघाले पाणी ; फसवणुकीचा गुन्हा दाखल

नाशिक : तेलाच्या डब्ब्यात पाणी भरून त्यात तेल आहे असे सांगून एकास सात डबे विक्री करून फसवणूक केल्याची प्रकार उघडकीस आला आहे़

शहरातील भाभानगर परिसरातील राजेश गिते यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी संशयित मुकेश वाघ (२६, रा. लासलगाव), सचिन विजय सोनवणे (१९, रा. पाथर्डीगाव), नितीन प्रल्हाद पहाडे (३०, रा. राणेनगर, आव्हाड मळा, नाशिक) हे तिघे तेलविक्रीसाठी आले़ या तिघा संशयितांनी गिते व त्यांच्याशेजारी राहणा-यांना ९०० रुपये प्रतिडब्बा याप्रमाणे सात तेलाचे डब्यांची विक्री केली व निघून गेले़

यानंतर या डब्यातील तेलाची तपासणी केली असता त्यामध्ये तेलाऐवजी पाणी निघाले़ अशाप्रकारे या तिघा संशयितांनी गिते व त्यांच्या शेजा-यांची सहा हजार ३०० रुपयांची फसवणूक केली़ या प्रकरणी मंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: nashik,oil,name,Sale,water,crime, registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.