शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

जिल्ह्यात वाढली टॅँकर्सची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 3:01 PM

नाशिक : उन्हाची तीव्रता वाढत आहे तशी पाण्याची टंचाईदेखील जाणवत असल्यामुळे आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत पाणी नियोजनावर भर देण्याच्या ...

ठळक मुद्देनियोजनाच्या सूचना : पाणी पातळी खालावली, धरणात १९ टक्के साठा

नाशिक : उन्हाची तीव्रता वाढत आहे तशी पाण्याची टंचाईदेखील जाणवत असल्यामुळे आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत पाणी नियोजनावर भर देण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांकडून देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या टॅँकर्सच्या संख्येत वाढ झाली असून, सिन्नर आणि नांदगाव या तालुक्यांमध्ये सर्वाधिक टॅँकर्सची संख्या झाली आहे. जिल्ह्यात २६८ टॅँकरद्वारे गाव आणि वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.कमी पर्जन्यमानामुळे यंदा दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून, पाणी टॅँकर्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात २० टॅँकर्सची संख्या वाढली असून, सिन्नर आणि नांदगावमध्ये सर्वाधिक ५१ टॅँकर्स सुरू आहेत. त्याबरोबरच मालेगाव आणि येवला, बागलाण, चांदवड या तालुक्यांमध्ये टॅँकर्सची मागणी वाढली आहे. आणखी काही तालुक्यांमधून टॅँकर्सच्या मागणीची नोंद होत आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाभरात पाणीपुरवठा करणाऱ्या २१८ टॅँकर्सची संख्या आता २३८ वर पोहचली आहे. टॅँकरची ही परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्याच्या सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत.गेल्या १४ एप्रिल रोजी जिल्ह्यात २१८ टॅँकर्सद्वारे गाव आणि वाड्यांना ८४० ठिकाणी पाणीपुरवठा केला जात होता. आताही ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याच्या टॅँकरची मागणी गावागावातून होऊ लागली आहे. जिल्हाभरातून आलेल्या मागणीनुसार गेल्या आठवड्यात २० टॅँकर्स वाढविण्यात आले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी