कुटुंबीयांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:08 IST2018-03-25T23:08:55+5:302018-03-25T23:08:55+5:30
नाशिक : आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची प्रकार वडाळागाव परिसरात उघडकीस आला आहे़ या प्रकरणी शाहरूख सलीम खान (२२, रा़ नानावली, भद्रकाली) या संशयितास भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे़

कुटुंबीयांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
नाशिक : आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची प्रकार वडाळागाव परिसरात उघडकीस आला आहे़ या प्रकरणी शाहरूख सलीम खान (२२, रा़ नानावली, भद्रकाली) या संशयितास भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे़
भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित शाहरूख खान हा चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस बदनामीची धमकी देऊन तिच्या आई-वडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन अत्याचार करीत होता़ अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराबाबत मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर पीडित मुलीच्या आईने भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयिताविरोधात फिर्याद दिली़
याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयित खान विरोधात बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे़