राहाता तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर नाशकात बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 16:36 IST2018-05-21T16:36:14+5:302018-05-21T16:36:14+5:30

नाशिक : शिर्डीला जाण्यासाठी बसच्या प्रतिक्षेत असलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून कान्हेरेवाडीत घेऊन जात तिच्यावर बलात्कार केल्याची घटना रविवारी (दि़२०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ पिडीत अल्पवयीन मुलगी ही अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील असून या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

nashik,minor,girl,rape,police,crime,registered | राहाता तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर नाशकात बलात्कार

राहाता तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर नाशकात बलात्कार

ठळक मुद्देसीबीएसजवळील कान्हेरेवाडीतील घटना

नाशिक : शिर्डीला जाण्यासाठी बसच्या प्रतिक्षेत असलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून कान्हेरेवाडीत घेऊन जात तिच्यावर बलात्कार केल्याची घटना रविवारी (दि़२०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ पिडीत अल्पवयीन मुलगी ही अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील असून या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहाता तालुक्यातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास सीबीएस बसस्थानकावर शिर्डीला जाणाऱ्या बसची वाट पाहत होती़ यावेळी दुचाकीवर आलेल्या अनोळखी व्यक्तीने ‘मी, अमोल सांगळे याचा मित्र आहे व त्याच्या चुलतभावाकडे घेऊन जातो़’ असे खोटे सांगून दुचाकीवर बसविले़ यानंतर सीबीएसच्या कान्हेरेवाडीतील एका बंद पडलेल्या हॉटेलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला़

या घटनेनंतर पिडीत मुलीने पोलिसांशी संपर्क साधला असता भद्रकाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते़ पिडीत मुलीच्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे़

Web Title: nashik,minor,girl,rape,police,crime,registered