उपनगरला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 17:47 IST2018-05-14T17:47:57+5:302018-05-14T17:47:57+5:30
नाशिक : खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीला खोलीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी (दि़१३) दुपारच्या सुमारास आगर टाकळी परिसरात घडली़ या प्रकरणी संशयित नितीन रमेश क्षीरसागर (३२, रा़ संत गाडगे महाराज वसाहत) विरोधात उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

उपनगरला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
नाशिक : खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीला खोलीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी (दि़१३) दुपारच्या सुमारास आगर टाकळी परिसरात घडली़ या प्रकरणी संशयित नितीन रमेश क्षीरसागर (३२, रा़ संत गाडगे महाराज वसाहत) विरोधात उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संत गाडगे महाराज वसाहतीत एक अल्पवयीन मुलगी दुपारच्या सुमारास बाहेर खेळत होती़ या मुलीला संशयित नितीन क्षीरसागर हा खेळण्याच्या बहाण्याने घरात घेऊन गेला़ यानंतर या मुलीसोबत अश्लील वर्तन करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला़ ही बाब पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तत्काळ उपनगर पोलीस ठाणे गाठून संशयित क्षीरसागर याच्या विरोधात फिर्याद दिली़
पोलिसांनी संशयिताविरोधात अत्याचार, लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे़