अल्पवयीन मुलीच्या अपहरणकर्त्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:27 IST2018-03-10T23:27:35+5:302018-03-10T23:27:35+5:30
नाशिक : सातपूर परिसरातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा संशयित तसेच अपहृत मुलीस शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सिडको परिसरातून ताब्यात घेतले आहे़ तानाजी राजेंद्र शेवाळे (२१, रा़ कार्तिकेयनगर, कामटवाडा, सिडको, मूळ रा़ चौगाव, ता़ सटाणा, जि़ नाशिक) असे या संशयिताचे नाव आहे़

अल्पवयीन मुलीच्या अपहरणकर्त्यास अटक
नाशिक : सातपूर परिसरातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा संशयित तसेच अपहृत मुलीस शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सिडको परिसरातून ताब्यात घेतले आहे़ तानाजी राजेंद्र शेवाळे (२१, रा़ कार्तिकेयनगर, कामटवाडा, सिडको, मूळ रा़ चौगाव, ता़ सटाणा, जि़ नाशिक) असे या संशयिताचे नाव आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १७ डिसेंबर २०१७ रोजी सातपूर परिसरातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला वडील रागावले म्हणून ती रागाने निघून गेली असता तिचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली होती़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अपहृत मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मात्र, गत अडीच महिन्यांपासून या मुलीचा शोध लागत नव्हता़ या मुलीचा तपास करीत असतानाच गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस नाईक देवकिसन गायकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती़ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी दिलेल्या सूचनांवरून पोलीस उपनिरीक्षक रवींद्र सहारे, संजय ताजणे, देवकिसन गायकर यांनी तपास करून कामटवाडा परिसरातून अपहृत मुलीसह तानाजी शेवाळे यास ताब्यात घेतले़ शहर गुन्हे शाखेने या दोघांनाही सातपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे़