महावितरणचे व्यवहार होणार आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 14:55 IST2018-04-22T14:55:25+5:302018-04-22T14:55:25+5:30
डिजिटीलायझेशनचा वापर करून महावितरणचे कंत्राटदारासंदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार गतीमान आणि पारदर्शक करण्यासाठी येत्या १ मे पासून महावितरणच्या ईआरपी प्रणालीतून केंद्रीकृत देयक प्रणाली राबविण्यात येणार आहे. या प्रणालीत राज्यातील सर्व कार्यालयातील देयके थेट आदात्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

महावितरणचे व्यवहार होणार आॅनलाईन
नाशिक :डिजिटीलायझेशनचा वापर करून महावितरणचे कंत्राटदारासंदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार गतीमान आणि पारदर्शक करण्यासाठी येत्या १ मे पासून महावितरणच्या ईआरपी प्रणालीतून केंद्रीकृत देयक प्रणाली राबविण्यात येणार आहे. या प्रणालीत राज्यातील सर्व कार्यालयातील देयके थेट आदात्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
सध्या महावितरणमध्ये स्थानिक पातळीवर विविध प्रकाराच्या कामांची बीले धनादेशच्या स्वरूपात देण्याची प्रक्रि या राबविण्यात येते. यामुळे या सर्व प्रक्रि येस काही प्रमाणात विलंब लागतो. त्यामुळे आर्थिक कामकाजात अधिक गतीमानता, पारदर्शकता आणण्यासाठी स्वयंचिलत सॅप प्रणालीद्वारे केंद्रीकृत देयक अदायगीची प्रक्रि या करण्यात येणार आहे.
या केंद्रीकृत प्रणालीतून कंत्राटदारांचे दरमहा सुमारे २० हजार आर्थिक व्यवहार हाताळले जाणार आहेत. अपारंपारिक वीज खेरेदीशी संबंधित ५ ते ६ हजार आर्थिक व्यवहाराची ही प्रक्रिया यापूर्वीच महावितरणने सुरू केलेली आहे. याशिवाय महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित ७५ ते ८० हजार एव्हढ्या आर्थिक व्यवहारासाठी ही प्रक्र ीया लवकरच राबविण्यात येणार आहे. या प्रणालीचा लाभ घेण्यासाठी कंत्राटदारांनी महावितरणच्या विभागीय कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी कंत्राटदाराने बँकेच्या तपशीलासह व्हेंडर नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल इत्यादी माहिती देणे बंधनकारक आहे.
--इन्फो--
कर्मचाऱ्यांना मिळणार प्री-पेड कार्ड
याशिवाय रोख व्यवहार कमी करण्यासाठी महावितरण कार्यालयातील दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना प्री-प्रेड कार्ड देण्यात येणार आहेत. राज्यभरात सुमारे 2 हजार कर्मचाऱ्यांना या कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्डाद्वारे ते आपल्या कार्यालयातील प्रशासकीय बाबीसंबंधिचा खर्च करू शकणार आहेत.