इगतपुरीला ट्रॅक्टरखाली सापडून सातवर्षीय चिमुकला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 23:16 IST2018-06-05T23:16:12+5:302018-06-05T23:16:12+5:30

नाशिक : ट्रॅक्टरवर बसून शेतात जात असलेल्या सातवर्षीय चिमुकल्याचा ट्रॅक्टरच्या फण व टायरमध्ये सापडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि़५) दुपारच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव येथे घडली. रोशन किशोर सोनवणे (७, रा. नांदडगाव, ता़ इगतपुरी, नाशिक) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेची घोटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

nashik,little,boy,killed,tractor | इगतपुरीला ट्रॅक्टरखाली सापडून सातवर्षीय चिमुकला ठार

इगतपुरीला ट्रॅक्टरखाली सापडून सातवर्षीय चिमुकला ठार

ठळक मुद्देइगतपुरी तालुक्यातील घटनाट्रॅक्टरच्या फण व टायरमध्ये अडकला

नाशिक : ट्रॅक्टरवर बसून शेतात जात असलेल्या सातवर्षीय चिमुकल्याचा ट्रॅक्टरच्या फण व टायरमध्ये सापडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि़५) दुपारच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव येथे घडली. रोशन किशोर सोनवणे (७, रा. नांदडगाव, ता़ इगतपुरी, नाशिक) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेची घोटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू विठ्ठल सोनवणे हे गावातून ट्रॅक्टर घेऊन शेतावर जात होते़ त्यांच्या पाठीमागे लागलेल्या रोशनला त्यांनी ट्रॅक्टरवर बसविले व शेताकडे निघाले़ घराजवळील मोकळ्या जागेतून जात असताना रोशन हा ट्रॅक्टरवरून खाली पडला व लोखंडी फण व टायरमध्ये सापडला़ यामध्ये त्याच्या कपाळास गंभीर दुखापत झाल्याने ट्रॅक्टरचालक राजू सोनवणे व विठ्ठल सोनवणे यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़

ट्रॅक्टरवरून पडल्याने गंभीर मार लागलेल्या रोशनचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धूम यांनी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घोषित केले. या घटनेमुळे नांदडगावावर शोककळा पसरली असून, पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: nashik,little,boy,killed,tractor