खडकाळीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 17:09 IST2018-03-28T17:02:13+5:302018-03-28T17:09:51+5:30

नाशिक : खडकाळी परिसरातील एका हॉटेलच्या भिंतीला लागून असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी (दि़२७) सकाळी भद्रकाली पोलिसांनी छापा टाकला़ यावेळी जुगार खेळणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़

 nashik,khadkali,gambling,Police,raid | खडकाळीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

खडकाळीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

ठळक मुद्दे रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त

नाशिक : खडकाळी परिसरातील एका हॉटेलच्या भिंतीला लागून असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी (दि़२७) सकाळी भद्रकाली पोलिसांनी छापा टाकला़ यावेळी जुगार खेळणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़

खडकाळी परिसरातील पाटकरी हॉटेलसमोरच्या भिंतीजवळ जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्यानंतर या ठिकाणी छापा टाकला असता संशयित सादीक मुहंमद मलबारी (रा़ गणेशनगर, वडाळा नाका) व त्याचा साथीदार टाईम नावाचा मटका जुगार खेळत होते़ पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक हजार ८४० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़

या दोघा संशयितांवर भद्रकाली पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  nashik,khadkali,gambling,Police,raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.