आयपीएल मॅचवर बेटींग सुरू असलेल्या हॉटेलवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 17:08 IST2018-04-15T17:08:28+5:302018-04-15T17:08:28+5:30
नाशिक : आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटींग लावणाऱ्या चौघा जुगा-यांना गंगापूर पोलिसांनी शुक्रवारी (दि़१३) रात्री छापा टाकून पकडले़ या चौघांवर गंगापूर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

आयपीएल मॅचवर बेटींग सुरू असलेल्या हॉटेलवर छापा
नाशिक : आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटींग लावणाऱ्या चौघा जुगा-यांना गंगापूर पोलिसांनी शुक्रवारी (दि़१३) रात्री छापा टाकून पकडले़ या चौघांवर गंगापूर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित सचिन दादाभाऊ फरकडे (२३, रा़ एन ४१, आनंदनगर, पवननगर, सिडको) व त्याचे तीन मित्र शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास हॉटेल रिगल बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये बसले होते़ हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील टेबल नंबर तीनवर बसून हे चौघे संशयित स्वत:च्या फायद्यासाठी रॉयल चॅलेंजर बैंगलोर व पंजाय इलेवन या संघाच्या आयपीएल मॅचवर लोकांकडून मोबाईलवर पैसे लावून बेटींग करून जुगार खेळत होते़
गंगापूर पोलिसांना या बेटींगबाबत माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून या चौघांना ताब्यात घेतले़ या प्रकरणी पोलीस हवालदार माणिक गायकर यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़