नाशिकमध्ये पती-पत्नीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 16:29 IST2018-06-15T16:29:48+5:302018-06-15T16:29:48+5:30
नाशिक : राहत्या घरी विषारी औषध सेवन करून पती - पत्नीने आत्महत्या केल्याची घटना आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास घडली.

नाशिकमध्ये पती-पत्नीची आत्महत्या
नाशिक : राहत्या घरी विषारी औषध सेवन करून पती - पत्नीने आत्महत्या केल्याची घटना आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबडमधील केवल पार्कमध्ये वासुदेव अंबादास जाधव (३८) व त्यांची पत्नी संगीता वासुदेव जाधव (३५, दोघेही मूळ रा.भोरटेक, ता. शिरपूर, जि. धुळे) हे दोघेच राहत होते. दुपारी बारा वाजेच्या सुमारास या दोघांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केल्याचे शेजारील नागरिकांच्या लक्षात आले त्यांनी तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
दरम्यान, या दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी अंबड पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.