हनुमान जयंती आणि मुस्लीम मोर्चामुळे वाहतूक मार्गात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:35 IST2018-03-30T22:35:13+5:302018-03-30T22:35:13+5:30
शनिवार, दि. ३१ रोजी शहरातून मुस्लीम महिलांचा निघणारा मोर्चा तसेच हनुमान जयंती असल्याने शिवाय याच दिवशी शहरात बिºहाड मोर्चादेखील दाखल होत असल्यामुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून, काही मार्ग बदलण्यात आले आहेत. यामुळे नाशिककरांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

हनुमान जयंती आणि मुस्लीम मोर्चामुळे वाहतूक मार्गात बदल
नाशिक : शनिवार, दि. ३१ रोजी शहरातून मुस्लीम महिलांचा निघणारा मोर्चा तसेच हनुमान जयंती असल्याने शिवाय याच दिवशी शहरात बिºहाड मोर्चादेखील दाखल होत असल्यामुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून, काही मार्ग बदलण्यात आले आहेत. यामुळे नाशिककरांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
शनिवारी हनुमान जयंती मिरवणूक वझरे मारुती मंदिर, चौकमंडई, दूधबाजार बादशाही कॉर्नर, धुमाळ पॉइंट, सांगली सिग्नल, मेहेर, अशोकस्तंभ, रविार कारंजा, मालेगाव स्टॅन्ड, रामकुंड, पंचवटी या मार्गाने जाणार असल्याने या मार्गावरील वाहतूक मिरवणूक कालावधीकरिता बंद राहणार आहे.
बिºहाड मोर्चा हा दुपारी ४ वाजता आदिवासी विकास भवन कार्याालयासमोर येणार असल्याने गडकरी सिग्नल ते मोडक सिग्नल या मार्गावरील वाहतूक बिºहाड माार्चा संपेपर्यत बंद करण्यात येणार आहे.
दुपारी १२ ते सायंकाळी ५ या काळात भद्रकाली बडीदर्गा येथून मुस्लीम महिलांचा मोर्चा सुरू होणार असून, मोर्चा दूधबाजार, खडकाळी सिग्नल, मोडक सिग्नल, गोल्फ क्लब मैदान येथे एकत्रित जमा होऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ जाणार आहे. मोर्चा मार्गावर वाहनांना जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तसेच सारडा सर्कल ते खडकाळी सिग्नल ते शालिमार, मुंंबईनाका पोलीस ठाणे ते सारडा सर्कलपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. या संदर्भातील आधिसूचना पोलिसांनी काढली असून, वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.