नागरिकांनो दुचाकी सांभाळा : शहरातून चार दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 04:04 PM2018-02-14T16:04:45+5:302018-02-14T16:06:26+5:30

नाशिक : शहरातून दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून आडगाव, पंचवटी, सरकारवाडा व नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतून प्रत्येक एक अशा चार दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

nashik,four,two,wheeler,theft | नागरिकांनो दुचाकी सांभाळा : शहरातून चार दुचाकींची चोरी

नागरिकांनो दुचाकी सांभाळा : शहरातून चार दुचाकींची चोरी

Next
ठळक मुद्देचार दुचाकी चोरट्यांनी नेल्या चोरून

नाशिक : शहरातून दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून आडगाव, पंचवटी, सरकारवाडा व नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतून प्रत्येक एक अशा चार दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

जुने सिडकोतील शनी मंदिराजवळील रहिवासी मंगेश राऊत यांची ५० हजार रुपये किमतीची पॅशन दुचाकी (एमएच १५ टीसी ३४५) चोरट्यांनी औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल समोरून चोरून नेली़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दुसरी घटना पंचवटीतील मखमलाबाद नाक्याजवळ असलेल्या पेठकर प्लाझा येथे घडली़ जेलरोड देवीमंदिराजवळील रहिवासी प्रशांत शेनगे यांची २० हजार रुपये किमतीची पॅशन दुचाकी (एमएच १९ एजी ७५२३) चोरट्यांनी पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पंचवटीतील टकलेनगर येथील रहिवासी स्वप्निल आंबेकर यांची ४० हजार रुपये किमतीची युनिकॉर्न दुचाकी (एमएच १५ ईएम १०८९)रविवार पेठेतील अवधूतस्वामी मठासमोर असलेल्या डांगर उतारावरून चोरट्यांनी चोरून नेली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दुचाकी चोरीची चौथी घटना जेलरोड येथील सीएनपीच्या गेटसमोर घडली़ जुना सायखेडा रोड परिसरातील जगदीश बूब यांची डिओ मोपेड (एमएच १५ ईव्ही ८३३३) चोरट्यांनी सीएनपीच्या गेटसमोरून चोरून नेली़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: nashik,four,two,wheeler,theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.