नाशकात चौघा संशयितांकडून तरुणास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 17:33 IST2018-05-15T17:33:22+5:302018-05-15T17:33:22+5:30

नाशिक : सिडको लेखानगरमधील इंदिरा गांधी वसाहतीत चौघा संशयितांनी तरुणास बेदम मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी (दि़१४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ रवींद्र गणराज असे मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे़

nashik,four,suspects,beaten,youth | नाशकात चौघा संशयितांकडून तरुणास बेदम मारहाण

नाशकात चौघा संशयितांकडून तरुणास बेदम मारहाण

ठळक मुद्देबेदम मारहाण ; जिवे ठार मारण्याची धमकी

नाशिक : सिडको लेखानगरमधील इंदिरा गांधी वसाहतीत चौघा संशयितांनी तरुणास बेदम मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी (दि़१४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ रवींद्र गणराज असे मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एकमध्ये रवींद्र गणराज (१९) हा तरुण हा राहतो. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास संशयित प्रकाश, गणेश, दादू व शरद (रा. इंदिरा गांधी वसाहत) यांनी मद्याच्या नशेत गणराज यास शिवीगाळ केली. यानंतर त्याच्या घरास लाथा मारून लाठी, पाइप तसेच हत्याराने जबर मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली़

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: nashik,four,suspects,beaten,youth