सराईत दुचाकीचोरट्याकडून पाच दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 17:40 IST2018-05-14T17:40:05+5:302018-05-14T17:40:05+5:30
नाशिक : शहरातील दुचाकी चोरल्याप्रकरणी अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत दुचाकीचोरट्यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने जेलरोड परिसरातून अटक केली़ रोहित मोहन जाधव (२१ रा.दसकगाव,जेलरोड) असे या दुचाकीचोराचे नाव असून त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत़

सराईत दुचाकीचोरट्याकडून पाच दुचाकी जप्त
नाशिक : शहरातील दुचाकी चोरल्याप्रकरणी अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत दुचाकीचोरट्यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने जेलरोड परिसरातून अटक केली़ रोहित मोहन जाधव (२१ रा.दसकगाव,जेलरोड) असे या दुचाकीचोराचे नाव असून त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत़
रहिवासी इमारती तसेच रस्त्यावर लावलेली वाहने काही मिनिटात चोरी करण्यात पटाईत असलेला सराईत दुचाकीचोर रोहीत जाधव याच्या मागावर अनेक दिवसांपासून पोलीस होते़ पोलिसांकडे असलेल्या दुचाकीचोरांच्या यादीत प्रथम क्रमांक असलेला जाधव हा जेलरोड परिसरता येणार असल्याची माहिती युनिट दोनचे पोलीस हवालदार श्रीराम सपकाळ यांना मिळाली होती़ या माहितीनुसार पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम सपकाळ, परमेश्वर वराडे व शिपाई बाळा नांद्रे यांनी सापळा रचून संशयित जाधव यास अटक केली़
पोलिसांनी जाधव याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने उपगनर पोलिस ठाणे हद्दीत तीन व नाशिकरोड हद्दीतील दोन वाहने चोरल्याची कबुली दिली़ दरम्यान, या अटकेमुळे शहरातील आणखीण काही दुचाकीचोरी उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़