पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज अस्मिता महिला मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 11:33 IST2018-04-11T21:41:17+5:302018-04-12T11:33:12+5:30

नाशिक : महाराष्ट्र  शासनाच्या ‘अस्मिता’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. १२ रोजी सकाळी १० वाजता ईदगाह मैदानावर महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी दिली.

nashik,first,female,meer,asmita,yojna ,munde | पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज अस्मिता महिला मेळावा

पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज अस्मिता महिला मेळावा

ठळक मुद्देजिल्ह्यात आत्तापर्यंत २५२१० किशोरवयीन मुलींची नोंदणी जिल्हाभरातून २० ते २५ हजार महिला उपस्थित राहणार

उपक्रम : पंकजा मुंडे राहणार उपस्थित नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या ‘अस्मिता’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. १२ रोजी सकाळी १० वाजता ईदगाह मैदानावर महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी दिली. महिला व किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणारी ‘अस्मिता’ ही महिलांना स्वाभिमान मिळवून देणारी योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गुरु वार, दि १२ रोजी सकाळी १० वाजता राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ईदगाह मैदानावर महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर योजना सुरू झाल्यानंतर पहिलाच महामेळावा शहरात होत असून या मेळाव्यामुळे अस्मिता योजना प्रभावीपणे ग्रामीण भागात पोहचण्यास मदत होणार असल्याचे शीतल सांगळे यांनी सांगितले. ग्रामविकास व महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या महत्त्वाकांशी अस्मिता योजनेची अंमलबजावणी राज्यभर सुरू आहे. नाशिक जिल्हा राज्यातील पहिला अस्मिता जिल्हा करण्याचा निर्धारही पंकजा मुंडे यांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यात या योजनेचे औपचारिक उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषद नाशिक यांच्यातर्फे अस्मिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात आत्तापर्यंत २५२१० एवढ्या किशोरवयीन मुलींची नोंदणी शासनाच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. राज्यात मुलींच्या अस्मिता नोंदणीमध्ये जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यातील ६१० बचतगटांनी शासनाच्या संकेत स्थळावर नोंदणी केली असून १३९ गटांनी शासनाकडे मागणी नोंदवली आहे. मेळाव्यासाठी जिल्हाभरातून २० ते २५ हजार महिला उपस्थित राहणार असून, जिल्ह्यातील आतापर्यंतचा हा मोठा महिला मेळावा असणार आहे.

Web Title: nashik,first,female,meer,asmita,yojna ,munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.