खताची एजन्सी मिळवून देण्याच्या आमिषाने दहा लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 19:30 IST2018-05-16T19:30:35+5:302018-05-16T19:30:35+5:30
नाशिक : खते व औषधे कंपन्यांची डीलरशिप मिळवून देतो असे सांगत शहादा येथील तिघा संशयितांनी शहरातील एका इसमाची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

खताची एजन्सी मिळवून देण्याच्या आमिषाने दहा लाखांची फसवणूक
नाशिक : खते व औषधे कंपन्यांची डीलरशिप मिळवून देतो असे सांगत शहादा येथील तिघा संशयितांनी शहरातील एका इसमाची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
विजय पाटील (रा. विश्वधारा सोसायटी, एबीबी सिग्नल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नंदुरबार येथील संशयित विनायक रतिलाल चौधरी, राजेंद्र रतिलाल चौधरी व राखी हरिदास चौधरी (रा. शहादा) यांनी मार्च २०१२ ते आॅगस्ट २०१३ या कालावधीत राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर व इफ्को फर्टिलायझर या कंपन्यांची एजन्सी (डीलरशिप) मिळवून देतो असे सांगून विश्वास संपादन केला. यानंतर पाटील यांच्याकडून वेळोवेळी रोख स्वरूपात तसेच बँकेच्या खात्यावर १० लाख ७५ हजार रुपये घेतले़ पैसे देऊनही डीलशिप मिळत नसल्याने पाटील यांनी संशयित चौधरी याच्याकडे चौकशी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली़
पाटील यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गंगापूर पोलीस ठाणे गाठून तिघांविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली़