फेसबुकद्वारे जुळलेल्या प्रेमसंबंधातून तरुणीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 17:41 IST2018-05-23T17:41:17+5:302018-05-23T17:41:17+5:30

नाशिक : सोशल मीडियावरील फेसबुकच्या माध्यमातून ओळख व त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झालेल्या संशयिताने विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर गंगापूर रोडवरील फ्लॅट तसेच जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे बलात्कार केल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी संशयित चेतन महाजन (रा़ नीलेश पार्क, गंगापूर रोड) विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात बलात्कारासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे़

nashik,facebook,Girlfriend,raped | फेसबुकद्वारे जुळलेल्या प्रेमसंबंधातून तरुणीवर बलात्कार

फेसबुकद्वारे जुळलेल्या प्रेमसंबंधातून तरुणीवर बलात्कार

ठळक मुद्देविवाहाचे आमिष ; बलात्कारासह अ‍ॅट्रॉसिटीच गुन्हा दाखल

नाशिक : सोशल मीडियावरील फेसबुकच्या माध्यमातून ओळख व त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झालेल्या संशयिताने विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर गंगापूर रोडवरील फ्लॅट तसेच जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे बलात्कार केल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी संशयित चेतन महाजन (रा़ नीलेश पार्क, गंगापूर रोड) विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात बलात्कारासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे़

पीडित तरुणीने गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित महाजन याने फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करून जवळीक निर्माण करून प्रेमसंबंध ठेवले़ यानंतर विवाहाचे आमिष दाखवून जानेवारी २०१८ ते २३ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत गंगापूर रोडवरील नीलेश पार्र्कमधील फ्लॅटवर बलात्कार केला़

यानंतर पीडित युवती प्रेमसंबंधाची माहिती देण्यासाठी संशयित चेतन महाजन याच्या जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे गेली असता त्याच्या वडिलांनी जातिवाचक शिवीगाळ करून मुलाच्या पुन्हा नादी लागली तर संपवून टाकील, असा दम दिला़ या पीडित युवतीच्या फिर्यादीनंतर पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण व वरिष्ठ पोलीस निरीक्षक के .डी़ पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली़

Web Title: nashik,facebook,Girlfriend,raped