नाशिक मनपा अतिक्रमण अधिकाऱ्यांना धमकी ; पोलिसांत गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 18:36 IST2018-04-29T18:36:47+5:302018-04-29T18:36:47+5:30
नाशिक : अंबड परिसरातील झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले मनपाचे विभागीय अधिकारी व अतिक्रमण अधिका-यांना धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणणा-या दोघांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ प्रशांत खरात व प्रवीण जाधव अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत़

नाशिक मनपा अतिक्रमण अधिकाऱ्यांना धमकी ; पोलिसांत गुन्हा
नाशिक : अंबड परिसरातील झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले मनपाचे विभागीय अधिकारी व अतिक्रमण अधिका-यांना धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणणा-या दोघांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ प्रशांत खरात व प्रवीण जाधव अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत़
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंंबड परिसरातील मारुती शोरूमजवळ असलेल्या शांतीनगर झोपडपट्टीतील अतिक्रमण काढण्यासाठी शुक्रवारी (दि़२७) महापालिकेचे अधिकारी गेले होते़ झोपडपट्टीतील अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू असताना संशयित प्रशांत खरात व प्रवीण जाधव यांनी गैरकायद्याची मंडळी जमा करून विभागीय अधिकारी डॉ़ सुनीता कुमावत व अधीक्षक अंकुश आंबेकर यांच्या अंगावर धावून आले़ तसेच अरेरावीची भाषा वापरून धमकी देत सरकारी कामात अडथळा आणला़
या प्रकरणी आंबेकर यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़