शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

नाशिकमध्ये गोठ्यात विद्युतप्रवाह उतरल्याने आठ म्हशींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 3:17 PM

नाशिक : विद्युत वितरण कंपनीची वायर तुटून गायी -म्हशीच्या गोठयावर पडल्याने लोखंडी पत्र्यात उतरलेल्या विजप्रवाहामुळे तब्बल आठ म्हशी दगावल्याची घटना औरंगाबाद रोडवरील सिद्धी विनायक लॉन्स शेजारी असलेल्या पवन डेअरीत रविवारी (दि.१८) सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली़ या गोठयावरून विद्युत वितरण कंपनीन्ची वायर गेल्याने ही घटना घडल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.

ठळक मुद्देऔरंगाबादरोडवरील घटना : दहा लाखांचे नुकसान विजवितरण कंपनीवर आरोप

नाशिक : विद्युत वितरण कंपनीची वायर तुटून गायी -म्हशीच्या गोठयावर पडल्याने लोखंडी पत्र्यात उतरलेल्या विजप्रवाहामुळे तब्बल आठ म्हशी दगावल्याची घटना औरंगाबाद रोडवरील सिद्धी विनायक लॉन्स शेजारी असलेल्या पवन डेअरीत रविवारी (दि.१८) सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली़ या गोठयावरून विद्युत वितरण कंपनीन्ची वायर गेल्याने ही घटना घडल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद रोडवरील सिद्धीविनायक लॉन्स शेजारी पवन लोहट यांच्या मालकीचा गुरांचा गोठा पवन डेअरी आहे़ लोहट यांच्या डेअरी उत्पादनासाठी या गोठ्यामध्ये शंभर म्हशी आहेत़ विद्युत वितरण कंपनीने काही दिवसांपुर्वीच या गोठयाच्या वरून विद्युतवाहिनी टाकली होती. रविवारी हवा सुटल्याने पोलवरील विजवाहिनी हलून विजेच्या तारा गोठयावरील लोखंडी पत्र्यांना स्पर्श होऊन शॉर्ट सर्किट झाले़ यामुळे गोठ्यात शॉर्ट सर्किट झाले व विद्युतप्रवाह गोठयात उतरून एका रांगेत बांधलेल्या आठ म्हशींना विद्युतप्रवाहाचा झटका बसल्याने त्या जागीच ठार झाल्या.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आडगाव पोलिस व स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाहणी तर पोलिसांनी पंचनामा केला़ रविवारी सकाळी या गोठयात विद्युतप्रवाह उतरून म्हशी दगावल्या त्यावेळी काही कामगारही गोठयात काम करीत होते़ सुदैवाने विजप्रवाह उतरल्याचे लक्षात आल्याने कामगारांनी गोठयाबाहेर पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले़विजवितरणची चुकीमुळे घटनाऔरंगाबाद रोडवरील पवन डेअरीजवळ विजवितरण कंपनीने विजवाहिनी टाकली होती. या विजवाहिनीमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांना विरोधही केला होता, मात्र तरीही विजवितरण कंपनीने ही विजवाहिनी टाकली़ रविवारी सकाळी शॉर्ट सर्किट होऊन विजप्रवाह उतरल्याने गोठयातील आठ म्हशी दगावल्या़ यामुळे सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.- पवन लोहट, डेअरी चालक

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातPoliceपोलिस