नाशिकमध्ये गोठ्यात विद्युतप्रवाह उतरल्याने आठ म्हशींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 15:30 IST2018-03-18T15:17:29+5:302018-03-18T15:30:00+5:30
नाशिक : विद्युत वितरण कंपनीची वायर तुटून गायी -म्हशीच्या गोठयावर पडल्याने लोखंडी पत्र्यात उतरलेल्या विजप्रवाहामुळे तब्बल आठ म्हशी दगावल्याची घटना औरंगाबाद रोडवरील सिद्धी विनायक लॉन्स शेजारी असलेल्या पवन डेअरीत रविवारी (दि.१८) सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली़ या गोठयावरून विद्युत वितरण कंपनीन्ची वायर गेल्याने ही घटना घडल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.

नाशिकमध्ये गोठ्यात विद्युतप्रवाह उतरल्याने आठ म्हशींचा मृत्यू
नाशिक : विद्युत वितरण कंपनीची वायर तुटून गायी -म्हशीच्या गोठयावर पडल्याने लोखंडी पत्र्यात उतरलेल्या विजप्रवाहामुळे तब्बल आठ म्हशी दगावल्याची घटना औरंगाबाद रोडवरील सिद्धी विनायक लॉन्स शेजारी असलेल्या पवन डेअरीत रविवारी (दि.१८) सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली़ या गोठयावरून विद्युत वितरण कंपनीन्ची वायर गेल्याने ही घटना घडल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद रोडवरील सिद्धीविनायक लॉन्स शेजारी पवन लोहट यांच्या मालकीचा गुरांचा गोठा पवन डेअरी आहे़ लोहट यांच्या डेअरी उत्पादनासाठी या गोठ्यामध्ये शंभर म्हशी आहेत़ विद्युत वितरण कंपनीने काही दिवसांपुर्वीच या गोठयाच्या वरून विद्युतवाहिनी टाकली होती. रविवारी हवा सुटल्याने पोलवरील विजवाहिनी हलून विजेच्या तारा गोठयावरील लोखंडी पत्र्यांना स्पर्श होऊन शॉर्ट सर्किट झाले़ यामुळे गोठ्यात शॉर्ट सर्किट झाले व विद्युतप्रवाह गोठयात उतरून एका रांगेत बांधलेल्या आठ म्हशींना विद्युतप्रवाहाचा झटका बसल्याने त्या जागीच ठार झाल्या.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आडगाव पोलिस व स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाहणी तर पोलिसांनी पंचनामा केला़ रविवारी सकाळी या गोठयात विद्युतप्रवाह उतरून म्हशी दगावल्या त्यावेळी काही कामगारही गोठयात काम करीत होते़ सुदैवाने विजप्रवाह उतरल्याचे लक्षात आल्याने कामगारांनी गोठयाबाहेर पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले़
विजवितरणची चुकीमुळे घटना
औरंगाबाद रोडवरील पवन डेअरीजवळ विजवितरण कंपनीने विजवाहिनी टाकली होती. या विजवाहिनीमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांना विरोधही केला होता, मात्र तरीही विजवितरण कंपनीने ही विजवाहिनी टाकली़ रविवारी सकाळी शॉर्ट सर्किट होऊन विजप्रवाह उतरल्याने गोठयातील आठ म्हशी दगावल्या़ यामुळे सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
- पवन लोहट, डेअरी चालक