पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हास्तरीय समिती गठित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 20:31 IST2018-05-23T20:31:24+5:302018-05-23T20:31:24+5:30

पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हास्तरीय समिती गठित
नााशिक: राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र मांतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या कृती आराखड्यातील नवीन पाणीपुरवठा योजनांच्या गावांचा समावेश करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. नरेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे.
शासनाच्या सूचनांनुसार सदरची समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने प्राप्त स्थळ पाहणी अहवालानुसार गावातील पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती नवीन योजनेची आवश्यकता व व्यवहार्यता याबाबत सविस्तर आढावा घेऊन नवीन योजनेची आवश्यकता असलेल्या गावांचा कृती आराखड्यात समावेश करण्याबाबत शिफारस करावयाची आहे.
समितीने शिफारस केलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनांच्या गावांची यादी स्थळ पाहणी अहवालानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांच्या मार्फत संचालक, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था यांच्याकडे सादर करावयाची आहे. जिल्हास्तरीय समितीमध्ये कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग हे सदस्य सचिव असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व भूजल सनियंत्रण व सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भू- वैज्ञानिक हे सदस्य आहेत.