सराईत गुन्हेगार तडीपार आघाव यास गंगापूरमधून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 18:41 IST2018-06-15T18:41:33+5:302018-06-15T18:41:33+5:30
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असतानाही न्यायालय वा पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता गंगापूरगावात फिरणारा संशयित मनोज राजू आघाव (वय 22, रा. गोदावरीनगर, देना पाटील स्कूलसमोर, गंगापूर गाव, नाशिक) यास गंगापूर पोलिसांनी गुरुवारी (दि़१४) सायंकाळी अटक केली़

सराईत गुन्हेगार तडीपार आघाव यास गंगापूरमधून अटक
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असतानाही न्यायालय वा पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता गंगापूरगावात फिरणारा संशयित मनोज राजू आघाव (वय 22, रा. गोदावरीनगर, देना पाटील स्कूलसमोर, गंगापूर गाव, नाशिक) यास गंगापूर पोलिसांनी गुरुवारी (दि़१४) सायंकाळी अटक केली़
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सराईत गुन्हेगार मनोज आघाव यास गुन्हेगारी कृत्यांमुळे २२ एप्रिल २०१८ पासून दोन वर्षांसाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार केले होते़ मात्र, पोलीस अधिकारी वा न्यायालयाची पूर्वपरवानगी न घेता तो सोमेश्वर धबधब्याजवळ फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आघाव यास अटक केली़
याप्रकरणी पोलीस नाईक भडिंगे यांच्या फिर्यादीवरून आघाव विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़