नाशिकमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 18:32 IST2018-06-15T18:32:00+5:302018-06-15T18:32:00+5:30
नाशिक : अल्पवयीन विद्यार्थिनीला बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करून तिच्या महाविद्यालयात जात तिची बदनामी करून विनयभंग केल्याचा प्रकार सिडकोतील एका महाविद्यालयात घडला आहे़

नाशिकमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा विनयभंग
नाशिक : अल्पवयीन विद्यार्थिनीला बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करून तिच्या महाविद्यालयात जात तिची बदनामी करून विनयभंग केल्याचा प्रकार सिडकोतील एका महाविद्यालयात घडला आहे़
अंबड पोलीस ठाण्यात पिडीत अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार १ मे ते १४ जून या कालावधीत संशयित गणेश पाटील (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) हा तिच्या मोबाईलवर फोन करून पाठलाग करीत होता़ या विद्यार्थिनीस ‘तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्यासोबत प्रेम केले नाहीस, तर मी तुझ्या आईवडिलांचे बरेवाईट करीन," अशी धमकी दिली़ तसेच वारंवार पाठलाग करून या विद्यार्थिनीस बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त केले.
यानंतर संशयित पाटील हा गुरुवारी (दि़१४) महाविद्यालयात आला व बदनामी करून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ या प्रकरणी अल्पवयीन विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात विनयभंग तसेच बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्यान्वये गुन्हादाखल करण्यात आला आहे़