कॉलेजरोडवरील चाकूहल्ल्यात दोघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:17 IST2018-03-26T22:17:31+5:302018-03-26T22:17:31+5:30

नाशिक : रंगपंचमीच्या दिवशी झालेल्या वादाची कुरापत काढून चौघा संशयितांनी एकावर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (दि़२४) सायंकाळी घडली़

nashik,college,road,youngstar,knife,attack | कॉलेजरोडवरील चाकूहल्ल्यात दोघे गंभीर

कॉलेजरोडवरील चाकूहल्ल्यात दोघे गंभीर

ठळक मुद्दे वादाची कुरापत काढून चाकू हल्ला

नाशिक : रंगपंचमीच्या दिवशी झालेल्या वादाची कुरापत काढून चौघा संशयितांनी एकावर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (दि़२४) सायंकाळी घडली़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरणपूररोडवरील मिशन मळा परिसरात राहणारा आकाश मधुकर कुरणेकर हा शनिवारी सायंकाळी कॉलेजरोडवरील अकबर सोडा दुकान परिसरातील विजू दाबेलीसमोर उभा होता़ यावेळी संशयित नावीन्या चव्हाण ऊर्फ डोन्या, ऋषीकेश गरड, अथर्व सानप व त्यांचा साथीदार असे चौघे तिथे आले व त्यांनी रंगपंचमीच्या दिवशी झालेल्या वादाची कुरापत काढली़ यानंतर चव्हाण व गरड या दोघांनी आकाशवर चाकूने हल्ला करून गंभीर दुखापत केली़ यावेळी आकाशचा मित्र सुनंद आहिरे हा सोडविण्यासाठी आला असता त्याच्यावर गरड याने पाठीमागून चाकूने वार केले़ यानंतर संशयित सानप व त्याच्या साथीदाराने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दमदाटी केली़

या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी आकाश कुरणेकरच्या फिर्यादीवरून चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, हल्ल्यानंतर संशयित फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे़

Web Title: nashik,college,road,youngstar,knife,attack