शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

विवाहितेवर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 22:18 IST

नाशिक : लग्नास अवघे अकरा महिने पूर्ण होत नाही तोच नवविवाहितेचा शेततळ्यात बुडून संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़२) दुपारच्या सुमारास पिंपळगाव बसवंत जवळील चिंचखेड येथे घडली़ प्रियंका महेश फुगट (२०, रा़ चिंचखेड) असे मयत विवाहितेचे नाव असून, मुलीच्या मृत्यूस जबाबदार नवरा व सासºयावर गुन्हा दाखल करून अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार ...

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत जवळील चिंचखेडची घटनामृत्यूस जबाबदार नवरा व सासºयावर गुन्हा दाखल करून अटक करामुलीला शेततळ्यात ढकलल्याचा आईचा आरोप आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

नाशिक : लग्नास अवघे अकरा महिने पूर्ण होत नाही तोच नवविवाहितेचा शेततळ्यात बुडून संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़२) दुपारच्या सुमारास पिंपळगाव बसवंत जवळील चिंचखेड येथे घडली़ प्रियंका महेश फुगट (२०, रा़ चिंचखेड) असे मयत विवाहितेचे नाव असून, मुलीच्या मृत्यूस जबाबदार नवरा व सासºयावर गुन्हा दाखल करून अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका माहेरच्यांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता़ अखेर पोलीस बंदोबस्त व दंगल नियंत्रण पथकाने तणावावर नियंत्रण मिळविल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले़ दरम्यान, याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत सासरच्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़

 

 

निफाड तालुक्यातील करंजगाव येथील प्रियंका मधुकर राजोळे (२०) हिचा अकरा महिन्यांपूर्वी पिंपळगाव बसवंतजवळील चिंचखेड येथील महेश बाबाजी फुगट याच्याशी विवाह झाला होता़ शनिवारी (दि़२) प्रियंका फुगट ही चिंचखेड शिवारात पालखेड पाटालगतच्या शेततळ्यात पडली़ नागरिकांनी तिला बाहेर काढल्यानंतर प्रथम पिंपळगाव बसवंत व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दारखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़ विशेष म्हणजे या घटनेची माहिती मुलीच्या माहेरच्यांना रात्री उशिरा देण्यात आली़

 

रविवारी (दि़३) मयत प्रियंकाच्या अंत्यसंस्कारासाठी चिंचखेड येथे पोहोचलेल्या माहेरच्यांनी मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेला नवरा महेश फुगट व सासरा बाबाजी फुगट तसेच नणंदवर गुन्हा दाखल करून अटक करीत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करू न देण्याची भूमिका घेतली़ यामुळे चिंचखेडमध्ये तणाव निर्माण झाला होता़ या परिस्थितीची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी देवीदास पाटील, वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए़ एस़ तारगे हे दंगल नियंत्रण पथक व पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी उपस्थित होते़ पोलीस अधिकारी पाटील यांनी मुलीच्या कुटुंबीयांची समजूत घातल्यानंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले़

ट्रॅक्टर घेण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणीअकरा महिन्यांपूर्वी मुलीचा विवाह करून दिला होता़ दोन महिन्यांपासून सासरची मंडळी ट्रॅक्टर घेण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करीत होते़ मात्र मोलमजुरी करीत असल्याने मी इतके पैसे देऊ शकत नसल्याने नवरा व सासºयाने मुलीला शेततळ्यात ढकलून मारले़ त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मला व माझ्या मुलीला न्याय द्यावा़- लता मधुकर राजोळे (रा. करंजगाव, ता़ निफाड, जि़ नाशिक), मयत मुलीची आई

 

पोलीस बंदोबस्त तैनात

चिंचखेड येथील तणावग्रस्त वातावरणामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ सायंकाळी सात वाजेच्या सुमारास विवाहितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ मुलीच्या माहेरच्यांनी तक्रार दिल्यानंतर नवरा व सासºयावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल़ सद्यस्थितीत या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे़- ए़ एस़ तारगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वणी