गॅस सिलिंडरची नळी तोंडात धरून नाशिकमध्ये उद्योजकाच्या मुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 16:51 IST2018-04-07T16:51:53+5:302018-04-07T16:51:53+5:30
नाशिक : एलपीजी गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर सुरू करून गॅसची नळी तोंडात धरीत उद्योजकाच्या पंचवीस वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास गंगापूर रोडवरील दादाजी कोंडदेव नगरमध्ये घडली़ अजिंक्य उदय खरोटे (२५, रा. ७, रेखांकित, दादोजी कोंडदेवनगर, गंगापूर रोड, नाशिक) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे़

गॅस सिलिंडरची नळी तोंडात धरून नाशिकमध्ये उद्योजकाच्या मुलाची आत्महत्या
नाशिक : एलपीजी गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर सुरू करून गॅसची नळी तोंडात धरीत उद्योजकाच्या पंचवीस वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास गंगापूर रोडवरील दादाजी कोंडदेव नगरमध्ये घडली़ अजिंक्य उदय खरोटे (२५, रा. ७, रेखांकित, दादोजी कोंडदेवनगर, गंगापूर रोड, नाशिक) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे़
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजिंक्य हा रात्रीच्या सुमारास एकटाच घरी होता़ रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्याने स्वयंपाकगृहातील गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर सुरू केले व नळी तोंडात धरून आत्महत्या केली़ या कालावधीत अजिंक्यचे वडील उदय खरोटे व आई हे दोघेही कामानिमित्त बाहेर गेले होते़ त्यांनी अजिंक्यच्या मोबाईलवर फोन लावण्याचा प्रयत्न केला मात्र फोन लागला नाही़ काही वेळाने घरी परतल्यानंतर अजिंक्यने आत्महत्या केल्याचे दिसले़ त्यांनी तत्काळ त्यास उपचारासाठी गंगापूर रोडवरील श्री गुरुजी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषीत केले़
दरम्यान,अजिंक्यच्या आत्महत्येच कारण समजू शकले नसून गंगापूर पोलीस तपास करीत आहेत़ तसेच अजिंक्यला सिलिंडरचे रेग्युलेटर सुरू करून गॅसची नळी तोंडात धरून आत्महत्येची कल्पना कोठून सुचली, त्यासाठी त्याने यूट्यूब वा गुगलवरून माहिती मिळविली का? याबाबत तपास केला जातो आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़
रक्ताचे नमुने तपासणीसाठी
अजिंक्य खरोटे या युवकाच्या तोंडावाटे एपीजी गॅस हा तोंडावाटे शरीरातून फुफ्फुस व फुफ्फुसावाटे संपूर्ण शरीरात मिसळल्याने पॉयझनिंग होऊन मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे़ न्यायवैद्यकीय तपासणीसाठी रक्ताचे नमुने ठेवण्यात आले असून त्याच्या तपासणीनंतर रक्तामध्ये गॅसचे प्रमाण किती होते वा मृत्यूचे नेमके कारण काय याबाबत स्पष्ट होईल़
- डॉ़ वैभव धुम, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय, नाशिक