बदनामी करीत असल्याचा आरोपावरून युवकावर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 18:01 IST2018-05-22T18:00:53+5:302018-05-22T18:01:54+5:30
नाशिक : बदनामी करीत असल्याचा आरोपावरून एका युवकावर चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि़२१) रात्री भगूरमधील पटेल गल्लीत घडली़ यामध्ये तबरेज हुसेन शेख हा युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत़ या प्रकरणी संशयित अय्युब गनी शेख (३०, रा. भगूर) विरोधात देवळाली कॅम्प पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़

बदनामी करीत असल्याचा आरोपावरून युवकावर चाकूहल्ला
नाशिक : बदनामी करीत असल्याचा आरोपावरून एका युवकावर चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि़२१) रात्री भगूरमधील पटेल गल्लीत घडली़ यामध्ये तबरेज हुसेन शेख हा युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत़ या प्रकरणी संशयित अय्युब गनी शेख (३०, रा. भगूर) विरोधात देवळाली कॅम्प पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़
कॅम्प पोलीस ठाण्यात अरबाज उर्फ आरिफ लियाकत पटेल या युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तो मामाची मुले तबरेज हुसेन शेख व हुजेफो हुसेन शेख यांच्यासमवेत पटेल गल्लीतून गप्पा मारीत जात होते़ त्यांना संशयित अय्युब गनी शेख याने अडवून इतरांजवळ माझी बदनामी का करतोस असे विचारून तबरेज शेख याच्याशी वाद घाताल़ या वादीवादीचे भांडणात रुपांतर झाल्यानंतर अय्युबने तबरेज मारहाण केली व हातातील चाकू त्याच्या पोटात भोसकला़
यामध्ये तबरेज शेख हा गंभीर जखमी झाला असून, त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.