Nashikar shook with a mysterious voice | गूढ आवाजाने नाशिककर हादरले
गूढ आवाजाने नाशिककर हादरले

ठळक मुद्देतर्कवितर्क : ‘सुपरसोनिक साउंड’ असल्याचा दावा

नाशिक : नाशिककर दैनंदिन कामात व्यस्त असताना अचानकपणे मंगळवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास एखाद्या मोठ्या स्फोटाप्रमाणे आकाशातून जोरदार आवाज कानी आला. या आवाजाने नाशिककर क्षणभर चांगलेच हादरले. याबाबत जिल्हा आपत्ती विभागाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता हा आवाज ‘सुपरसोनिक साउंड’ असल्याचा दावा केला गेला. कोठेही अनुचित दुर्घटना घडली नसल्याची खात्री ग्रामीण पोलीस दलाने पटविली.
मंगळवारी (दि. २०) दुपारी ४ वाजून २५ मिनिटांनी शहरात अचानकपणे जोरदार आवाज ऐकू आला. या आवाजाची तीव्रता इतकी प्रचंड होती की घरात, कार्यालयांमध्ये दैनंदिन कामात व्यस्त असलेल्या नागरिकांनाही त्याची जाणीव झाली. त्यामुळे क्षणभर नाशिककरांच्या मनात विविध शंकांचे काहूरही माजले. नेमका इतक्या मोठ्या प्रमाणात कसला आवाज ऐकू आला? याविषयीची उत्सुकताही ताणली गेली. या उत्सुकतेमधून सोशल मीडियावरही तर्कवितर्क लढविले जाऊ लागले. शहराजवळ देवळाली कॅम्प शिवारातील सैन्याचे तोफखाना केंद्र आहे.


Web Title: Nashikar shook with a mysterious voice
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.