शहरातील दोन अल्पवयीन बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 18:37 IST2018-08-17T18:35:52+5:302018-08-17T18:37:03+5:30
नाशिक : शहरातून लहान मुले व मुली बेपत्ता होण्याच्या घटना सुरूच आहेत़ गत दोन दिवसांत शहरातून एका मुलासह एक मुलगी बेपत्ता झाली असून, या प्रकरणी पंचवटी व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

शहरातील दोन अल्पवयीन बेपत्ता
नाशिक : शहरातून लहान मुले व मुली बेपत्ता होण्याच्या घटना सुरूच आहेत़ गत दोन दिवसांत शहरातून एका मुलासह एक मुलगी बेपत्ता झाली असून, या प्रकरणी पंचवटी व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पंचवटीतील नामको बँक परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी बिस्किट आणण्यासाठी गेली मात्र घरी परतलीच नाही़ अनेक तास उलटूनही मुलगी घरी न परतल्याने तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती सापडली नाही. या प्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिकरोड परिसरातील गुलाबवाडी येथील सहा वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना बुधवारी (दि़१५) घडली़ सायंकाळच्या सुमारास मुलगा घरातून बेपत्ता झाल्याने त्याचा शोघ घेतला असता तो सापडला नाही़ या प्रकरणी बेपत्ता मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़