नाशिकमध्ये कापड रिसायकल कारखान्याला भीषण आग, शॉर्टसर्किट झाल्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 15:28 IST2017-12-25T15:13:41+5:302017-12-25T15:28:25+5:30
नाशिकमधील दीपाली नगरमध्ये असलेल्या कापड रिसायकल कारखान्याला सोमवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागली.

नाशिकमध्ये कापड रिसायकल कारखान्याला भीषण आग, शॉर्टसर्किट झाल्याची माहिती
नाशिक- नाशिकमधील दीपाली नगरमध्ये असलेल्या कापड रिसायकल कारखान्याला सोमवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. कारखान्यात शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली.अब्बास अशरफ अली यांचा कापड रिसायकलचा कारखाना आहे. शॉर्टसर्किट होऊन सव्वा दोन वाजता आग लागली. घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशामक दलाचे सहा बंब घटनास्थळी पोहचले होते. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवून आग विझवली.
वर्षभरापूर्वी हा कारखाना सुरू करण्यात आला होता. जुने कपडे घेऊन त्याद्वारे इलेक्टरीक यंत्रातून भुगा करून गाद्या बनविल्या जात होत्या. दैनंदिन हे काम सुरू असताना अचानकपणे मुख्य मुख्य स्विचजवळ आवाज होऊन आग लागली.