नाशिक शिक्षक मतदारसंघ प्रारूप मतदार यादीची तयारी 

By Sandeep.bhalerao | Published: November 21, 2023 01:52 PM2023-11-21T13:52:00+5:302023-11-21T13:52:30+5:30

निवडणूक आयोगाने नाशिक व मुंबई विभागातील शिक्षक मतदारसंघांसाठी मतदारयाद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

Nashik Teacher Constituency Draft Voter List Preparation | नाशिक शिक्षक मतदारसंघ प्रारूप मतदार यादीची तयारी 

नाशिक शिक्षक मतदारसंघ प्रारूप मतदार यादीची तयारी 

नाशिक:  नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी सुरू झाली असून,  २३ नाेव्हेंबर रोजी प्रारूप मतदारयादी जाहीर केली जाणार आहे. मे २०२४ मध्ये नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेची मुदत संपणार असल्याने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 

निवडणूक आयोगाने नाशिक व मुंबई विभागातील शिक्षक मतदारसंघांसाठी मतदारयाद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार नोंदणी अधिनियमानुसार २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध होणार असून, ९ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी देण्यात आला आहे. प्राप्त होणारे दावे व हरकती  २५ डिसेंबर रोजी  निकाली काढण्यात येतील, तर ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.  

२०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत किशोर दराडे हे विजयी झाले होते आता मे २०२४ मध्ये त्यांचा कालावधी पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. केवळ शिक्षकांसाठी असलेल्या या निवडणुकीसाठी सलग सहा वर्षे सेवेत आणि सलग तीन वर्षे अध्यापनाचा अनुभव असलेल्या शिक्षकांनाच मतदार यादीत नावनोंदणी करता येते.

Web Title: Nashik Teacher Constituency Draft Voter List Preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक