नाशिकचा जलतरण संघ रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST2021-09-25T04:14:17+5:302021-09-25T04:14:17+5:30
नाशिक : पुण्यातील डेक्कन जिमखान्यात होणाऱ्या राज्य जलतरण निवड चाचणीसाठी भोसला साई केंद्र नाशिक यांचा २१ खेळाडूंचा ...

नाशिकचा जलतरण संघ रवाना
नाशिक : पुण्यातील डेक्कन जिमखान्यात होणाऱ्या राज्य जलतरण निवड चाचणीसाठी भोसला साई केंद्र नाशिक यांचा २१ खेळाडूंचा संघ रवाना झाला आहे.
कोरोनामुळे जवळपास सर्वच जिल्हातील जलतरण तलाव बंद असल्याने राज्य संघटनेने निवड चाचणी आयोजित केली आहे. कोरोनाकाळात या खेळाडूंचा शारीरिक तंदुरुस्तीचा अभ्यास करून घेतल्याने खेळाडू निश्चितच चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा भोंसला मिलिटरी स्कूलचे सहकार्यवाहक हेमंत देशपांडे, चेअरमन प्रशांत नाईक, कमांडंट एम. एम. मसूर, चीफ ट्रेनिंग ऑफिसर जे. के. मिश्रा यांनी व्यक्त केली. तसेच आपली सर्वोच्च कामगिरी करुन भोंसला साई केंद्राचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा त्यांनी खेळाडूंना दिल्यात. हे सर्व खेळाडू साई जलतरण प्रशिक्षक प्रसाद खैरनार, भोंसलाचे प्रशिक्षक घनश्याम कुंवर, विलास देशमुख, शिवानी कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली भोंसला मिलिटरी स्विमिंग पूलवमध्ये सराव करतात. या निवड चाचणीमधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जाणार आहे. ही निवड चाचणी जवळपास २५ विविध प्रकारच्या जलतरण प्रकारात होणार आहे.