नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कारवाईमध्ये दिंडोरी तालुक्यात १० लाखांचा गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 18:20 IST2025-12-09T18:19:43+5:302025-12-09T18:20:43+5:30
एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कारवाईमध्ये दिंडोरी तालुक्यात १० लाखांचा गांजा जप्त
नाशिक: नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मंगर यांच्या पथकाने दिंडोरी तालुक्यात छापा टाकून तब्बल दहा लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
दि.०८ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस निरीक्षक रवींद्र मंगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव येथील बाळकवामनवाडी परिसरात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पथकाने तात्काळ सापळा रचून येथे छापा टाकला.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत संशयित नाना देवराम शेंडे याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून एकूण ५० किलो १७० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ज्याची किंमत १०,०२,५०० इतकी आहे.आरोपीवर दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस. कायद्याच्या अनर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्यात आणखी काही धागे दोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता असून,प्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत.