नाशिकरोडला गावठी कट्टा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:23 AM2019-03-12T00:23:47+5:302019-03-12T00:24:03+5:30

एकलहरेरोड येथे संशयास्पद फिरणाऱ्या युवकाकडून नाशिकरोड पोलिसांनी एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे.

 Nashik Road seized raw cotton | नाशिकरोडला गावठी कट्टा जप्त

नाशिकरोडला गावठी कट्टा जप्त

Next

नाशिकरोड : एकलहरेरोड येथे संशयास्पद फिरणाऱ्या युवकाकडून नाशिकरोड पोलिसांनी एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे.  एकलहरारोड येथील एका हॉटेलजवळ एक युवक संशयास्पद उभा असल्याची माहिती नाशिकरोड  पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक  उत्तम दळवी यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एकलहरारोड  येथील सापळा रचून संशयास्पद  उभ्या असलेल्या युवकाला हटकले असता तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून  संशयित सागर आहिरे (वय २८ रा. अरिंगळे मळा, एकलहरारोड) यास पकडून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा व दोन काडतुसे मिळून आली.

Web Title:  Nashik Road seized raw cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.