नाशिककरांनी घेतला किल्ले जीवधनच्या संवर्धनाचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:53 PM2021-02-08T16:53:58+5:302021-02-08T16:54:36+5:30

जानोरी : नाशिकच्या स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेने जुन्नर तालुक्यातील किल्ले जीवधनच्या कल्याण दरवाजा पायरी मार्गाच्या संवर्धनाचा ध्यास घेतला असून, पर्यटकांकडून संस्थेच्या स्वयंसेवकांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.

Nashik residents took care of the conservation of the fort | नाशिककरांनी घेतला किल्ले जीवधनच्या संवर्धनाचा ध्यास

नाशिककरांनी घेतला किल्ले जीवधनच्या संवर्धनाचा ध्यास

Next
ठळक मुद्देस्वराज्य संवर्धन बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम

किल्ले जीवधनच्या कल्याण दरवाजाच्या वरचा पायरी मार्ग ब्रिटिश काळात सुरुंग लावून फोडण्यात आला होता व तो मोठमोठ्या दगडांनी गाडला गेला होता. स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या स्वयंसेवकांकडून ते दगड फोडून मोकळा करण्यासाठी सुरुवात केली. विशेष म्हणजे रात्री १२ वाजता नाणेघाट येथे मुक्काम करून सकाळी किल्ल्यावरील सात पाय-ऱ्यांवरील मोठमोठे दगड फोडून व ते दगड किल्यावर संवर्धित केले. २२० किलोमीटरचा प्रवास करुन आलेल्या स्वयंसेवकांचे संवर्धन कार्य पाहून त्याठिकाणी येणार्‍या पर्यटकांनी संस्थेचे कौतुक केले. संवर्धनासाठी प्रवीण भेरे, भाऊसाहेब चव्हाणके, भाऊसाहेब कुमावत, सजन फलाने, नितीन ठाकरे, मयूर घुले, पंकज ठाकरे, प्रवीण घोलप , आशिष घोलप, नितीन देशमुख, करण कानडे, शुभम मेधने, समाधान जाधव, अमोल शिरसाठ, अक्षय उगले, गौरव पाटील, प्रशांत देशमुख, वैभव झनकर, नीलेश शिंदे, साईराज जाधव, बापू गांगुर्डे यांनी योगदान दिले. पस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी ट्रेलचे विश्वस्त विनायक खोत, विजय कोल्हे, प्रशांत केदारी व रमेश खरमाळे यांनी संवर्धन कार्यात सहभागी होऊन मार्गदर्शन केले. येणाऱ्या काळात शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य संपूर्ण पायरी मार्ग मोकळा करणार असून किल्ले संवर्धन व जतनाचा संदेश ते तरुणांना याच माध्यमातून देणार आहेत.

Web Title: Nashik residents took care of the conservation of the fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.