नाशिक-पळसन बसला घागबारी गावाजवळ अपघात
By प्रसाद गो.जोशी | Updated: September 17, 2023 19:22 IST2023-09-17T19:20:31+5:302023-09-17T19:22:54+5:30
बसमध्ये सुरे ४५ प्रवासी होते. मात्र केवळ .दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले.

नाशिक-पळसन बसला घागबारी गावाजवळ अपघात
विष्णू बोरसे -
बोरगांव : सुरगाणा तालुक्यातील घागबारी येथे नाशिक डेपोची पळसनहून नाशिककडे निघालेली बस (क्र. एम एच १४ बी टी ४५०८) ही समोरून येणाऱ्या पिकअपला वाचविण्याच्या प्रयत्नात घागबारी येथे खड्यात पडली. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
समोरून येणारी पिक अप गाडी बस वर येत होती. या पिक अपला वाचविण्यासाठी बस चालकाने बस रस्त्याच्या साइडला उतरविली आणि ब्रेक लावला. यावेळी बस गवतावरून स्लीप होऊन खड्यात गेली. बसमध्ये सुरे ४५ प्रवासी होते. मात्र केवळ .दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले.