Nashik Oxygen Leak: नाशिकमधील घटना अतिशय वेदनादायी, फडणवीसांकडून सखोल चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 03:30 PM2021-04-21T15:30:49+5:302021-04-21T15:34:04+5:30

Nashik Oxygen Leak: दुर्घटनेच्या तब्बल २ तासानंतर नाशिक महापालिका आयुक्तांनी रुग्णालयस्थळी भेट दिली. ऑक्सिजन गळती प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

Nashik Oxygen Leak: The incident in Nashik is very painful, demanding a thorough investigation by devendra fadanvis | Nashik Oxygen Leak: नाशिकमधील घटना अतिशय वेदनादायी, फडणवीसांकडून सखोल चौकशीची मागणी

Nashik Oxygen Leak: नाशिकमधील घटना अतिशय वेदनादायी, फडणवीसांकडून सखोल चौकशीची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. नाशिकमध्ये जे घडले ते भयंकर आहे.

नाशिक - एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना दुसरीकडे नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या टाकीला दुपारी १२ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत तब्बल २२ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. या घटनेनंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना शोक व्यक्त केला. तसेच घटनेच्या सखोल चौकशीची मागणीही केली. 

दुर्घटनेच्या तब्बल २ तासानंतर नाशिक महापालिका आयुक्तांनी रुग्णालयस्थळी भेट दिली. ऑक्सिजन गळती प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. १० ते ११ रुग्ण मृत्यू पडल्याची शक्यता असल्याचं महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं. सध्या, हॉस्पिटलमध्ये साधारणपणे १५० रुग्ण आहेत. ऑक्सिजन गळती होत असल्याने रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा हळूहळू संपत चालला आहे. त्यामुळे आणखी रुग्ण दगावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. 

नाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. नाशिकमध्ये जे घडले ते भयंकर आहे. या दुर्घटनेत 11 लोक मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती असून हे अतिशय वेदनादायी आहे. सद्यस्थितीत रुग्णालयातील इतर रुग्णांच्या मदतीसाठी प्राधान्य देण्यात याावे, गरज पडल्यास त्यांना इतरत्र हलवावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, या दुर्घटनेच्या सखोल चौकशीची मागणीही फडणवीस यांनी केली आहे. 

महापालिकेचे कोविड रुग्णालय

ऑक्सिजन गळती रोखण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. या दुर्घटनेत १०-११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असली तरी आणखी रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्सिजन नसल्याने रुग्णांची प्रकृती खालावत चालली आहे. महापालिकेचे हे संपूर्ण कोविड रुग्णालय आहे. अनेक रुग्ण ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरवर आहेत. ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने अशा रुग्णांचा जीव धोक्यात आला असून त्यांना अन्य ऑक्सिजन असलेल्या रुग्णालयात स्थलांतरीत  करण्यात येत आहे. 

20 दिवसांपूर्वीच बसवली होती टाकी

नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून तातडीने १५ जम्बो ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी झाकीर हुसेन रूग्णालयात पाठविण्यात येत आहे. १० के एलची टाकी आहे. १५-२० दिवसांपूर्वीच ही टाकी बसविली होती. नाशिक महापालिकेने न्यू बिटको आणि झाकीर हुसेन रुग्णालयात ठेकेदारामार्फत भाड्याच्या टाक्या बसविल्या आहेत. 
 

Web Title: Nashik Oxygen Leak: The incident in Nashik is very painful, demanding a thorough investigation by devendra fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.